MNS Nitin Sardesai saam tv
मुंबई/पुणे

MNS Nitin Sardesai : मराठी भाषा दिनाच्या दुसऱ्याच दिवशी नितीन सरदेसाईंना आला वाईट अनुभव, VIDEO शेअर करत म्हटलं...

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

राज्यात काल (२७ फेब्रुवारी) रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सरकारकडून वेगाने प्रयत्न देखील केले जात आहेत. मात्र मराठी भाषेला कसं डावललं जातं, याचा अनुभव मनसे नेते नितीन सरदेसाई यांना मुंबई-रत्नागिरी प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनसे नेते नितीन सरदेसाई यांना प्रवासादरम्यान आलेला अनुभव त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केला. नितीन देसाई यांनी आपल्या व्हिडीओत सांगितलं की, मी आता मुंबईहून मडगाव असा तेजस एक्स्प्रेसने प्रवास करत आहे. मी रत्नागिरीला जात आहे. या तेजस एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या वाचनासाठी काही वर्तमानपत्र ठेवले आहेत.

मात्र त्यात एकही मराठी वृत्तपत्र नाही. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वृत्तपत्र नसावं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मी याबाबत रेल्वे प्रशासनाशी नक्कीच बोलणार आहे.

मात्र मुंबईतून बाहेर जाणाऱ्या सर्व प्रवाशांनी रेल्वेत मराठी वृत्तपत्र असावीत याबाबत आग्रही असायला हवं. यापुढे रेल्वेत मराठी वृत्तपत्र मिळावीत ही मागणी आपण केली पाहिजे, असंही नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

यूजर्सच्या प्रतिक्रिया

नितीन सरदेसाई यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नितीन सरदेसाई यांच्या भूमिकेचे सर्वचजण कौतुक करत आहेत. तुम्ही अगदी बरोबर प्रश्न उपस्थित केला आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये देखील हीच स्थिती आहे, असं एका यूजरने सांगितलं. तर आणखी एका यूजरने म्हटलं की, मराठी वृत्तपत्रांना रेल्वेने प्राधान्य दिलं पाहिजे, असं म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

SCROLL FOR NEXT