Raju Patil On Bhagat Singh Koshyari Saam TV
मुंबई/पुणे

Raju Patil : कोश्यारी इथे आले पण.., मनसे आमदार राजू पाटलांचा सणसणीत टोला

मनसे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा राज्यपाल कोश्यारी यांना सणसणीत टोला लगावला आहे.

प्रदीप भणगे

दिवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील  (Uddhav Thackeray)  नेत्यांकडून भाजपवर कठोर शब्दात टीका करण्यात येत आहे. यातच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा राज्यपाल कोश्यारी यांना सणसणीत टोला लगावला आहे.

'कोश्यारी यांच्या वक्तव्यावर आम्ही बोलण्यापेक्षा भाजपने बोलायला पाहिजे. खरंतर कोश्यारी इथे आले पण होशयारी तिकडेच ठेऊन गेलेत. त्यांना त्यांच्या होश्यारीची गळा भेट करायला परत त्याच्या गावाला पाठवून द्यायला पाहिजे', असा टोला मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी भगतसिंह कोश्यारी यांना लगावला.

रविवारी दिवा शहरात मनसे तर्फे कार्यकर्त्यांचा मेळावा भरवण्यात आला होता. यावेळी सुमारे साडेपाचशे सामान्य नागरिक, महिला आणि तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला. तसेच मनसे आमदार पाटील यांनी दिवा शहरात विकास कामाची भमिपूजन सुद्धा केले. या कार्यक्रमात राजू पाटील यांनी कोश्यारींना खडेबोल सुनावले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की 'एक तर आपण काय इतिहास बदलू शकत नाही. काही गोष्टी माहित नसतात त्याच्यावर उत्तरे दिली जातात. त्यावेळी जी परिस्थिती काय होती, त्या वेळेचे लिहिलेले पात्र त्याचे संदर्भ काय आहेत', असा सवाल त्यांनी केला.

'कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सरसकट मत व्यक्त केली जातात.हे निवडणुका जवळ आल्यावरच जास्त होत असतात. कोश्यारी यांच्या वक्तव्यावर आम्ही बोलण्यापेक्षा भाजपने बोलायला पाहिजे. खरंतर कोश्यारी इथे आले पण होशयारी तिकडेच ठेऊन गेलेत. त्यांना त्यांच्या होश्यारीची गळा भेट करायला त्यांना परत त्याच्या गावाला पाठवून द्यायला पाहिजे', असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistani Celebrities Banned in India: भारताने २४ तासांत पुन्हा बंदी घातली 'या' पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर

Maharashtra Live News Update: कन्नड नगर परिषदेची दुमजली इमारत कोसळली

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

SCROLL FOR NEXT