Uddhav Thackeray : शिवसेना आणि वंचित आघाडीची युती होणार? उद्धव ठाकरेंच्या त्या विधानामुळे चर्चांना उधाण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एका मंचावर आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांचं तोंडभरून कौतुक केलं.
Uddhav Thackeray Prakash Ambedkar
Uddhav Thackeray Prakash AmbedkarSaam Tv
Published On

Uddhav Thackeray Latest Speech : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज या चर्चेने अधिकच जोर धरला आहे. कारण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एका मंचावर आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांचं तोंडभरून कौतुक केलं.

Uddhav Thackeray Prakash Ambedkar
Shinde vs Thackeray : शिंदे गट आदित्य ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या एका विधानामुळे दोन्ही पक्षांमध्ये युती होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आमचे वैचारिक व्यासपीठ एक आहे. दोन विचारांचे वारसे पुढे घेऊन जात आहोत, असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे. या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

'माझी आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची ओळख नाही, असे नाही. आम्ही बोलतो, भेटतो. पण त्यांची भेट घ्यायची म्हणजे वेळ काढून भेटायला हवं. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा प्रकाश आंबेडकर आहेत. त्यामुळे त्यांना भेटायचं म्हणजे मिनिटांचं गणित नसायला हवं. आज आम्ही पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलो आहोत. मात्र आमचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे'.

Uddhav Thackeray Prakash Ambedkar
Tushar Gandhi : महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी गोडसेंना बंदूक पुरवली; तुषार गांधींचं खळबळजनक ट्विट

पुढे ठाकरे म्हणाले, की 'याच कारणामुळे एकत्र येण्यात आम्हाला अडचण आली नाही. आम्ही दोन्ही विचारांचे वारसे घेऊन पुढे चालत आहोत. प्रबोधनकार यांच्या विचारांच्या मुशीतून आम्ही तयार झालो. माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आज मात्र त्याला कौटुंबिक रुप आले आहे. आज दोन नातू एकत्र आले आहेत'.

'सत्ता पिपासू लोकांना सत्तेतून खाली खेचा'

'सध्याची परिस्थिती पाहिली तरी आपल्या देशाची वाटचाल हुकुमशहाच्या दिशेने चालली आहे. इंग्रजांची निती होती तशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. जाती- धर्माच्या भिंती उभा करण्याचं काम सध्या सुरू आहे. वाटेल त्या मार्गाने सत्ता मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना खाली खेचलं पाहिजे. लोकशाही पायदळी तुडवून सत्ता मिळवणाऱ्यांना खाली खेचा', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com