अभिजीत देशमुख
Kalyan News : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत व मनसे नेते अभिजीत पानसे यांनी एकमेकांचे भेट घेतली. यामुळे मनसे-ठाकरे गटाच्या युतीबद्दल चर्चा रंगू लागली होती. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी युती होईल असे मला वाटत नाही. मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची पण इच्छा असली पाहिजे. समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, असा टोला नाव न घेता राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
माझी अजिबात इच्छा नाही, ते फक्त अडचणीत असल्यावर आम्ही काय युती करावी. आमचे राज ठाकरे अडचणीत असताना घरी कौटुंबिक प्रसंग घडला असताना तुम्ही आमचे नगरसेवक फोडले.
आता तुमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला. आम्ही आतापर्यंत कोणाशी युती केली नाही, यापुढे करू नये असे माझे वैयक्तिक मत असल्याचंही राजू पाटील यांनी म्हटलं. (Political News)
आजच्या राजकीय परिस्थितीसाठी उद्धव ठाकरे जबाबदार
सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या फोडाफोडीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी पक्षाअंतर्गत ही बाब आहे. मात्र या गोष्टीची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्यापासून झाली. जनतेने दिलेला कौल मान्य करून हिस्स्यासाठी भांडले नसते तर या गोष्टी सुद्धा घडल्या नसत्या.
त्यामुळे एकट्या देवेंद्र फडणवीस यांना दोष देऊन उपयोग नाही. लोकांनी जो कौल दिला होता त्या विरोधात जे घडले त्यामुळे जनता देखील भोगते आहे, असा टोलाही पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.