Shivsena-MNS Alliance: राज-उद्धव एकत्र येणार? मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव, दोन बड्या नेत्यांमध्ये चर्चा

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance राज ठाकरे यांच्या मनसेने शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाला युतीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.
Raj Thackeray on Uddhav Thackeray
Raj Thackeray on Uddhav ThackeraySaam tv
Published On

Shivsena MNS Alliance: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धव ठाकरे यांच्या गटाला युतीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला असल्याचं सूत्रांंनी सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) मोठ्या घडमोडी घडत आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं भगदाड पडलं आहे. अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटामध्ये नाराजीचा सूर देखील पाहायला मिळत आहे.

Raj Thackeray on Uddhav Thackeray
Shinde Group MLA Clash: मंत्रिपदावरून शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये बाचाबाची? मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने वाद मिटला!

या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. एकीकडे राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत.

या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटासोबत युती करावी, असा सूर एका बैठकीत दिला होता.

आता मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव मिळाला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मनसे नेते अभिजित पानसे संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी सामना कार्यालयात पोहचले होते. या भेटीत त्यांनी मनसे-ठाकरे गट युतीसंदर्भात प्रस्ताव दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Raj Thackeray on Uddhav Thackeray
Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का? राज्य सहकारी बँक घोटाळ्यात कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी!

विशेष बाब म्हणजे येत्या ८ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) चिपळून दौऱ्यावर जाणार होते. परंतू आज सकाळीच त्यांनी आपला दौरा रद्द केला. त्यानंतर आता मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांना वेग आला आहे.

ठाकरे गटाकडून जोरदार हालचाली

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज दुपारी साडेबारा वाजता तातडीने बैठक बोलावली आहे. दादर येथील शिवसेना भवनात ही बैठक होणार असून या बैठकीत ठाकरे गटाचे सर्व आमदार-खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान आजच्या बैठकीत पुढे महाविकास आघाडीमध्ये राहायचं की एकला चलोचा मर्ग स्वीकारायचा याबद्दलची भूमिका उद्धव ठाकरे आज जाहीर करण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com