MNS MLA Raju Patil Criticise BJP saam tv
मुंबई/पुणे

Raju Patil News: 'भाजपने जागर यात्रा काढावी, गाजर यात्रा नाही; मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून मनसे आमदार राजू पाटील यांची खोचक टीका

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Raju Patil News In Marathi :

मुंबई-गोवा महामार्गावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने मुंबई-गोवा महामार्गावर कोकण जागर यात्रा काढल्यानंतर आता कल्याण ग्रामीण जागर यात्रेची पोस्ट व्हायरल झाली आहे. यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. 'भाजपने जागर यात्रा काढावी, गाजर यात्रा काढू नका, अशा शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. (Latest Marathi News)

भाजपच्या 'कल्याण ग्रामीण जागर यात्रा' अशी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मतदार संघ हा मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. राजू पाटील म्हणाले, 'भाजपने जागर यात्रा काढावी, मी तिथला लोकप्रतिनिधी आहे. माझ्या काही चुका असतील, त्यांनी मला दाखवाव्यात. त्यांनी जागर यात्रा काढली तर मी त्यांना अतिरेकी म्हणणार नाही. त्यांच्या समस्या समजून घेऊ आणि त्यातून मार्ग काढू. ४ वर्ष बर्मुडा घालून बसायचं निवडणुका आल्या की बाहेर पडायचं असे काही जणांचे कार्यपद्धती असते. त्याप्रमाणे हे चाललंय, असा टोला भाजप पदाधिकाऱ्यांना लगवाला आहे.

दरम्यान, यावेळी राजू पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. 'अनेक डॉक्टर प्रशासनात आहेत. राजकारणात आहेत. मात्र लोकांच्या समस्यांची नस अजून सापडली नाही हे दुर्दैव आहे. असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

भररस्त्यात मृतदेह स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडिओ कल्याण मध्ये व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर कल्याण- डोंबिवलीमधील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी मृतदेहावर बोलून राजकारण करणे मला संयुक्तिक वाटत नाही, ती यात्रा होती. ती मृत पावलेल्या प्रशासनाचे प्रतिक होते. अशा गोष्टीवर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही'.

'मी सुद्धा कोविड काळात एक रुग्णवाहिका दिली होती. प्रशासन पण हलगर्जीपणा करते. आरोग्याच्या बाबतीत सगळा सावळा गोंधळ आहे. अनेक डॉक्टर प्रशासन आणि राजकारण करत आहेत. त्यांना लोकांच्या समस्यांची नस सापडलेलीच नाही, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी नाव घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT