iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Mumbai BKS Apple Store : शुक्रवारपासून भारतात iphone 16 च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. मुंबईतील बीकेसी भागात असलेले अ‍ॅपल स्टोअर बाहेर फोन खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.

भारतात iPhone 16 च्या विक्रीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. या नव्या फोनच्या खरेदीसाठी iPhone प्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये असलेल्या अॅपलच्या स्टोअर बाहेर iPhone च्या चाहत्यांची प्रचंड झुंबड उडलेली दिसली. मुंबईशिवाय दिल्लीतील अॅपलच्या स्टोअर बाहेरही अशीच गर्दी दिसून आली आहे. यासाठी काही जणांनी रात्रीपासून अॅपलच्या स्टोअरच्या बाहेर रांगा लावल्या होत्या.

जगभरात प्रसिद्ध असलेल्या ॲपल कंपनीने काही दिवसांपूर्वीच आयफोन १६ या नव्या मोबाइल फोन मॉडेलची घोषणा केली होती. तसेच १३ सप्टेंबरपासून प्री बुकिंगही सुरु करण्यात आली होती. दरम्यान, आजपासून आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच देशभरातील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांच्या रांगा बघायला मिळत आहेत. मुंबईतील बीकेसी भागात असलेले अ‍ॅपलचे स्टोअर हे देशातील पहिल्या काही अ‍ॅपल स्टोअरपैकी एक आहे. याठिकाणी फोन खरेदी करण्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com