Shrikant Shinde Vs Raju Patil Saam TV
मुंबई/पुणे

Raju Patil: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का? राजू पाटील यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Raju Patil News: रोहित पवार यांच्या दाव्यावर भाष्य करताना मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Raju Patil News:

राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे. रोहित पवार यांच्या दाव्यावर भाष्य करताना मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघावर मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

मनसे आमदार राजू पाटील यांनी रोहित पवार यांच्या दाव्यावर भाष्य करताना म्हणाले की, 'रोहित पवार यांना राजकीय वारसा आहे. त्यांच्या घरात चर्चा सुरू असतील त्यातून त्यांना ही टीप मिळाली असेल.माझं त्यांच्या एका वाक्याला समर्थन आहे. कल्याण लोकसभा भाजपला जाण्याची शक्यता आहे या मतदारसंघात सध्या वाटचाल देखील त्याच दिशेने सुरू आहे.

'भाजपचे मोठे नेते अनुराग ठाकूर या लोकसभा मतदारसंघात बैठका घेतात. त्यामुळे या ठिकाणची उमेदवारी कोणता पक्ष घेईल याबाबत संभ्रम आहे असे सांगितले. तसेच पक्षाने आदेश दिल्यास ही लोकसभा मतदारसंघात मनसे लढवेल आणि स्वबळावर ही निवडणूक लढवेल असे देखील सांगितले.

दरम्यान, कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेना शिंदे गटासह भाजपला लक्ष केले.

'प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालं आहे. वन विंडो स्कीम सुरू आहे. या ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत. अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यात सत्ताधारी देखील सहभागी असतात. त्यामुळे त्यांना कोणी भीक घालत नाही. त्यामुळे जसे गणपती खड्ड्यातून गेले, तसेच येत्या निवडणुकीत यांनाही खड्ड्यात टाका तरच आपलं भलं होईल, अशी सडेतोड टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह महापालिका प्रशासनावर केली.

या दरम्यान, माझ्या वाढदिवसाच्या बॅनर लावू नका एका बॅनर ऐवजी निदान एक खड्डा भरा, असं आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केलं . त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

SCROLL FOR NEXT