Raju Patil  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : पक्षाचे धोरण राज ठाकरे ठरवतील; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर राजू पाटील यांचा खुलासा

Raju patil on ravindra chavan statement : मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसे महायुतीसोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर युतीबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी खुलासा केला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

Raju Patil Latest News :

भाजप नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसे महायुतीसोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर युतीबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी खुलासा केला आहे. 'पक्षाचे धोरण राज ठाकरे ठरवतील. स्थानिक पातळीवर आम्ही एकत्रित असतो हे मान्य करायला काही हरकत नाही, असं राजू पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

मनसे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघातील दहिसर मोरी येथील एका रस्त्याचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी आम्ही तिघेही एकत्रित असतो अशी प्रतिक्रिया दिल्याने उपस्थित सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. या वक्तव्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी एकत्रित असण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

राजू पाटील नेमकं काय म्हणाले?

आम्ही विकास कामे एकत्रित करत असतो. मी केलेल्या कामांचा पाठपुरावा केला,त्यानंतर त्यांना विकासकामांना निधी दिला. तर दहिसर मोरी येथील कार्यक्रमात ते आणि मीही उपस्थित होतो. त्यामुळे त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचे कारण नाही. पक्षाचे धोरण राज ठाकरे ठरवतात. तेही त्या दृष्टीने बोलले. स्थानिक पातळीवर आम्ही एकत्र असतो, ते मान्य करायलाही काही हरकत नाही, असा खुलासा मनसे आमदार राजू पाटील यांनी केला. rra

रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले होते?

रवींद्र चव्हाण म्हणाले की, आम्ही तिघे एकत्र आहोत. काही वेळेस वरिष्ठ मंडळींची जी भावना असते, ती भावना स्पष्ट करता येत नसते. कल्याण लोकसभेमधील असलेले आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित आहोत. युती यासंदर्भातले निर्णय वरिष्ठ मंडळी घेत असतात. परंतु स्थानिक पातळीवर अनेक वर्ष विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय. तसेच आम्ही हिंदुत्व आणि विकासाच्या अजेंड्यावर एकत्रित आहोत. आमचा मतदारसंघ उजव्या विचारसरणीचा आहे, या उजव्या विचारसरणीच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे पुन्हा हॅट्रिक करणार ,असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

Assembly Election: सरकारची दोरी, शेतकऱ्यांच्या हाती; कांद्यापाठोपाठ सोयाबीन महायुतीला रडवणार?

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT