Raj Thackeray Uddhav Thackeray Photo Saam tv
मुंबई/पुणे

MNS Vs Shivsena: 'आरे'ला कारे करणार, राज ठाकरेंवर हल्ला कराल तर...' ठाण्यातील राड्यानंतर मनसे नेत्याचा ठाकरे गटाला इशारा

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, मुंबई|ता. ११ ऑगस्ट २०२४

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला. उद्धव ठाकरे यांची सभा असलेल्या ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर शेण, नारळही मारले. या हायहोल्टेज ड्राम्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली असून राज ठाकरेंवरील हल्ला खपवून घेणार नाही, असा थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

"कालची जी घटना घडली ती क्रियेला प्रतिक्रिया होती. एका ठिकाणी क्रिया करायची आणि पळून जायचं आणि सावरासावर करायची जी काल संजय राऊत यांनी केली. बीडमध्ये तुम्हाला न विचारता जिल्हाप्रमुखांनी आंदोलन केले का? मराठा आरक्षणाचा आड घ्यायचा अन् राज ठाकरेंवर हल्ला करायचा. राज साहेबांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, पुन्हा असं झालं तर पुन्हा प्रतिक्रिया होईल," असा थेट इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

तसेच "आम्ही महाराष्ट्राची संस्कृतीला जपतो, मात्र तुम्ही त्यांना प्रतिप्रश्न केला का? आम्ही सुरुवात केली नाही, त्यांनीच सुरुवात केली. संजय राऊत यांना प्रतिप्रश्न केला का? एकदा त्यांना पण विचारा कारण त्यांनी आधी नवनीत राणा यांच्या गाडीवर पण हल्ला केला होता. आम्ही संस्कृती पाळतो, पण आमच्या नेत्यावर हल्ला केल्यास षंडासारखे गप्प बसणार नाही," असेही संदीप देशपांडे म्हणाले.

तसेच "आमच्याकडे पण बाळासाहेबांचे विचार आहेत. असं प्रत्येकाने ठरवलं तर महाराष्ट्रात परिस्थिती काय होईल. सर्व महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन, आम्ही संजय राऊतांसारखे पळपुटे नाही. आम्ही जे केले तो बोलतो दुसऱ्यावर ढकलत नाही. बीडमध्ये गाडीचा ताफा अडवायला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे होते का?" असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला इशारा दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पुण्यातील पेठ परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

Nashik Crime : पतीच्या लटकत्या मृतदेहाखाली पत्नीची दुर्गापूजा? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Maharahstra Politics: रश्मी ठाकरे भावी मुख्यमंत्री; मातोश्रीच्या परिसराबाहेरील बॅनरमुळे चर्चांना उधाण

Chess Olympiad: भारत बनला चॅम्पियन; पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकत रचला इतिहास

Mumbra building slab collapse : मुंब्र्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, ५ वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT