Raj Thackeray On Assembly Election Result Saam TV
मुंबई/पुणे

गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्च्याला परवानगी, मराठी लोकांना का नाही? मनसेचा सरकारला संतप्त सवाल, मीरा भाईंदरचे वातावरण तापलं

MNS leader Sandeep Deshpande : मीरा भाईंदर मोर्चापूर्वी मनसे कार्यकर्त्यांना अटक, संदीप देशपांडे यांचा सरकारवर आरोप – अमराठी मोर्च्याला परवानगी, आम्हाला नाही?

Namdeo Kumbhar

Sandip Deshpande on Mira Bhayandar MNS Morcha : मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून आज मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले आहे. अमराठी व्यापाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून आजचा मोर्चा काढण्यात येणार आहे. पण या मोर्चाआधीच मनसेचे संदीप देशपांडे आणि शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोर्चा काढू नये त्यामुळे पोलिसांकडून मनसे नेत्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. पण मनसे मोर्चावर ठाम असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अमराठी व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी दिली जाते, पण मराठी माणसाला मोर्चाची परवानगी दिली जात नाही, असे संदीप देशपांडे यांनी टीका केली. संदीप देशपांडे यांनी मीरा भाईंदर प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली. मराठी आणि अमराठी असा वाद लावला जातोय, असा आरोपही यावेळी त्यांनी केली.

मीरा भाईंदरमध्ये पोलिसांची दडपशाहीच आहे. एकीकडे व्यापाऱ्यांना पोलिासांनी खुली सुट द्यायची आणि मराठी माणसाला आत टाकायचं. सरकारला याचे परिणाम भागावे लागतील, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी देशपांडे यांनी केला आहे. अविनाश जाधव आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आज पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मीरा भाईंदर मोर्चा होणार की नाही? याबाबत मनसैनिकांच्या मनात संभ्रम होता. पण संदीप देशपांडे यांनी कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा होईलच, असे स्पष्ट केले.

अविनाश जाधव यांच्यासह आमच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण मीरा भाईंदरमध्ये मोर्चा निघणारच. आज होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल. मराठी माणसाच्या नेतृत्वात आजचा मोर्चा निघेल. मोर्चा मराठी माणसासाठी होता, त्यामुळे हा मोर्चा मराठी माणूस काढेल. सामान्य मराठी माणूस मोर्चाचे नेतृत्व करेल. मराठी माणासांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय. काहीही झाले तरी आजचा मीरा भाईंदरमधील मोर्चा निघणारच, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान, मराठीचा अपमान केल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये ती घटना घडली. आम्ही काही कुणालाही मराठी येत नाही म्हणून मारत नाही. आमचा हिंदीला कोणताही विरोध नाही. पण मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

भाजपचे नेते प्रक्षोभक विधाने करतात, त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवून आणायच्या आहेत. पण आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. आम्ही असल्या कोणत्याही घाणेरड्या वृत्तीला बळी पडणार नाही. महाराष्ट्रात मराठी विरूद्ध अमराठी असा वाद निर्माण करण्याचे भाजपकडून षडयंत्र रचले जात आहे. त्याला आम्ही बळी पडणार नाही. बिहार निवडणुकीत फायदा व्हावा, त्यामुळे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुबेसारख्या लोकांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत आहे. बिहारमध्ये बसून महाराष्ट्राबद्दल बोलणार आहे. महाराष्ट्रातील वातावरण खराब व्हावे, याचं भाजपचे षडयंत्र आहे. भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकल्या आहेत. मराठी-अमाराठी वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असेल तर सरकारने कारवाई करावी. दुबेसारख्यांनाही सरकारने सांगायला हवे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indigo Airplane : मधमाशांमुळे इंडिगो विमान उड्डाण रखडले, नेमकं काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग

Weight Loss: एका महिन्यात ४-५ किलो वजन कमी करता येतं का?

Bharat Bandh : मोठी बातमी! कोट्यवधी कामगारांकडून बुधवारी भारत बंदची हाक; शाळा, बँका, पोस्ट ऑफिस... काय बंद राहणार?

Mumbai Local : गर्दी टाळण्यासाठी कामाची वेळ बदला, ८०० कार्यालयांना शिफ्ट बदलण्याचे मध्य रेल्वेने केले आवाहन

SCROLL FOR NEXT