Sandeep Deshpande Attack Video Saam TV
मुंबई/पुणे

Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे सीसीटीव्हीत कैद; आरोपी स्टंप घेऊन आले अन्...

Sandeep Deshpande Attack Video : संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला करणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागले आहे.

Rashmi Puranik

Sandeep Deshpande News : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क परिसरात मॉर्निग वॉकसाठी गेले असता, चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर स्टंपने हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, संदीप देशपांडे  (Sandeep Deshpande) यांच्यावर स्टंपने हल्ला करणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागले आहे. विशेष बाब म्हणजे या सीसीटीव्ही फुटेजमुळे दोन आरोपींचे फोटोही समोर आले आहेत. या आरोपींचा शोध पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. मुंबई पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तब्बल आठ पथकं तैनात केली आहेत.

व्हिडीओत काय आहे?

संबंधित सीसीटीव्हीत (Viral Video) एक आरोपी हातात स्टंप घेऊन जाताना दिसत आहे. काही आरोपींनी मास्क घातलेले दिसत आहे. हल्ल्यानंतरचे हे फुटेज असल्याचं सांगितलं जातंय. एक आरोपी मध्येच टाकून पळतानाही दिसतोय. हल्ल्यानंतर पळत असतानाचा हा सीसीटीव्ही आहे. आरोपी हे टॅक्सीमधून आले होते आणि टॅक्सीमधून पळून गेले, असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे.

नेमकं काय घडलेलं?

मनसे नेते संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. नेहमी त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र शुक्रवारी ते एकटेच होते. ही संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प आणि रॉड होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, हल्लेखोरांना देशपांडे यांनी चांगलाच प्रतिकार केला. दरम्यान, हल्लोखोरांशी झटापट करत असताना संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांना डोक्याला किंवा शरीरावर इतर कुठे जखम झाली नाही. हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमधील लोक त्यांच्या मदतीला धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले.

दरम्यान, हल्ल्यानंतर जखमी देशपांडेंना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित ठाकरेही आले. तर गंभीर इजा नसल्यानं उपचार करुन संदीप देशपांडेंना डिस्चार्ज देण्यात आला. अज्ञातांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि धमकी देणे अशा कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT