Raj Thackeray on Uddhav Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray Melava In Mumbai: ठाकरे बंधू एकत्र येणार का? राज ठाकरे लवकरच भूमिका करणार जाहीर

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज ठाकरे आता नेमकी काय भूमिका घेणार आहेत याकडे मनसे कार्यकर्त्यांसोबतच संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Priya More

रुपाली बडवे, मुंबई

MNS News: राज्यामध्ये सध्या राजकीय उलथापालथ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी बंड पुराकरत काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy CM Ajit Pawar) शपथ घेतली. अजित पवारांच्या या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला.

राज्यातल्या या राजकीय परिस्थितीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) लवकरच आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मुंबईमध्ये राज ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. राज ठाकरे आता नेमकी काय भूमिका घेणार आहेत याकडे मनसे कार्यकर्त्यांसोबतच संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातल्या राजकीय परिस्थितीनंतर मनसे पक्ष देखील आता सक्रीय झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच मुंबईत मेळावा घेणार आहेत.या मेळाव्याच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करणार आहे. राज्यातील राजकीय भूकंपानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीवर राज ठाकरे बोलणार का? यावरही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे राज ठाकरेंचा चिपळून दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. ८ जुलैला राज ठाकरे चिपळूणचा दौरा करणार होते. पण आता त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीनंतर राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार? ते उद्धव ठाकरेंना साथ देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या बंडखोरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी अजित पवारांच्या बंडखोरीमागे बहुदा शरद पवारच असतील, अशी शक्यता व्यक्त केली होती. अजित पवारांबरोबर गेलेल्या तीन नेत्यांवरही त्यांनी संशय उपस्थित केला होता.

राज ठाकरेंनी सांगितले होते की 'जे झालंय ते अत्यंत किळसवाणं आहे. जर तुम्ही जनमताचा कानोसा घेतला तर प्रत्येक घरात तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील. हा मतदारांचा घोर अपमान आहे. यावर मी भाषणात अनेकदा बोललो आहे. या सर्व गोष्टींवर सविस्तर मेळावे घेईल.' आता राज ठाकरे मुंबईत मेळावा घेणार आहेत. तर अजित पवारांबाबत ते काय बोलणार आहेत हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT