mns is aggressive about loudspeakers on masjid. msn spread posters near shivsena bhavan MNS
मुंबई/पुणे

मशिदीच्या भोंग्यांवरून मनसे आक्रमक; शिवसेना भवनासमोर लावले पोस्टर्स...

MNS Latest News: मनसे कार्यकर्त्यांनी दादरमधील शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेली सभा चांगलीच गाजली. या सभेत त्यांनी मशीदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राजकारण तापलं होतं. याबाबत आता मनसे (MNS) कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी दादरमधील शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) पोस्टरबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. (mns is aggressive about loudspeakers on masjid. mns spread posters near shivsena bhavan)

हे देखील पहा -

"उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा बोलायला बंदी घालतात, भोंगे काढतात असं म्हणत बाळासाहेब आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने राज साहेब ठाकरे (Raj Thackeray) चालवत आहेत, जमल्यास उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी द्या" अशा आशयाचे पोस्टर्स मनसैनिकांनी सेनाभवनासमोर लावले आहेत.

मशिदीवरील भोंग्याबाबत राज ठाकरेंची भूमिका -

मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: धारावीतून ज्योती गायकडवाड आघाडीवर

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT