नवले पूल अपघातप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची 'मनसे'ची मागणी सागर आव्हाड
मुंबई/पुणे

नवले पूल अपघातप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची 'मनसे'ची मागणी

मुंबई-बंगळूर महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातप्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व रिलायन्स इन्फ्रा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातप्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआयए) व रिलायन्स इन्फ्रा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. 'मनसे'च्या रस्ते, वाहतूक व आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांनी रिलायन्स आणि एनएचआयए यांच्या हलगर्जीपणामुळेच या दोन निष्पाप महिलांचा बळी गेल्याचा आरोप करत पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

काल नवले पुलाजवळील सेल्फी पॉईंट येथे भीषण अपघात होऊन दोन महिला जागीच ठार झाल्या होत्या, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. या महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, अनेक ठिकाणी खचलेला रस्ता आणि अर्धवट कामे यामुळे हा महामार्ग अपघातांचे केंद्र बनला आहे. अनेकदा अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव जात आहेत.

या दोन्ही संस्थांकडे वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, अशा घटना वाढत आहेत. कात्रज बोगद्यापासून नऱ्हेपर्यंत तीव्र उतार असल्याने रबरी रिफ्लेक्टर लावण्याची गरज आहे. जेणेकरून वाहन चालकांचा वेग कमी होईल आणि अपघात घडणार नाहीत, अशी मागणी वाल्हेकर यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

SCROLL FOR NEXT