MNS Dahihandi News Saam TV
मुंबई/पुणे

दहीहंडीला श्रेयाच्या मोठ्या बाता मारणाऱ्यांसाठी....; राज ठाकरेंचा व्हिडिओ शेअर करत मनसेचा टोला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यभरात आज दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे दहीहंडी साजरी करता आली नाही. त्यामुळे आजचा उत्सव गोविंदा खूप आनंदाने साजरा करत आहेत.

शिवाय शिंदे-फडणवीस सरकारने राज्य भरातील दहीहंडी उत्सवावरील सर्व निर्बंध उठवले आहेत. कोणत्याही अटी शर्तीविना आजचा दहीहंडी उत्सव साजरा करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केल्यामुळे गोविंदाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

मुंबई-ठाण्यामधील दहीहंडी (Dahihandi) उत्सवाला एक वेगळा इतिहास आणि परंपरा आहे. शिवाय आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आज दहीहंडीचं आयोजन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी सकाळपासून अनेक दहीहंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी एक ट्विट केलं असून या ट्विटद्वारे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारला टोला लगावला आहे. पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी मनसे ! आपल्या दहिहंडीच्या परंपरेवर नियमांचं सावट होतं तेव्हा त्याविरोधात आवाज उठवला व थेट न्यायालयाला जाब विचारण्याची हिंमत दाखवली ती राजसाहेबांनी.

म्हणूनच आज दहीहंडीच्या निमित्ताने कॅमेऱ्यासमोर श्रेयासाठी मोठ्या बाता मारणाऱ्यांसाठी हा व्हिडीओ' असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे की, 'न्यायदान जिकडे होतं, ज्या कोर्टामध्ये ही गोष्ट होते तेथे जर एखादी व्यक्ती कोणाच्या विरोधात याचिका घेऊन गेली. तर तुम्ही सुरक्षिततेची कोणती काळजी घेतली? आजपर्यंत काय काय केलं? हे विचारायला नको का?

शिवाय कोणीतरी कोर्टात जायचं आणि कोर्टाने निर्णय द्यायचा. मुळात हे प्रकरण कोर्टात गेली कशासाठी सरकारने जर आचारसंहिता आखून दिली असती तर या गोष्टी कशा झाल्या असत्या. या प्रकरणात कोर्टाचा संबंध काय? दहीहंडीची गोष्ट सुप्रीम कोर्टापर्यंत जाते असा आक्रमक पवित्रा राज या या व्हिडीओमध्ये घेतला आहे.

पाहा व्हिडीओ -

तसंच व्हिडीओमध्ये राज ठाकरे आपल्या हातामध्ये दहीहंडीवरती लावलेले निर्बंध वाचून दाखवताना दिसत आहेत. त्यांनी गोविंदाना देखील यावेळी सल्ला दिला आहे. विनाकारण ८, ९ थर लावायची गरज नाही. जर सराव असेल तर त्यांनी थर लावावे. सरकारने देखील जास्त प्रकरण ताणू नये असं या व्हिडीओमध्ये राज ठाकरे बोलताना दिसतं आहेत.

त्यामुळे एकीकडे दहिहंडीच्या (Dahihandi) उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा आणि (गोविंदा) "प्रो गोविंदा" स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. तर दुसरीकडे मनसेने निर्बंधासाठी आपण आवाज उठवला असल्याचं सांगितल्यामुळे आता दहीहंडी निर्बंध उठवल्याच्या श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT