Kalyan dombivli Saam tv
मुंबई/पुणे

KDMC Election : महापालिका निवडणुकीपूर्वी कल्याणमध्ये मतदार यादीत गोंधळ; मनसेने केली पोलखोल, ३२ हजार दुबार नावे उघड

Kalyan Dombivli Muncipal Corporation : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मतदार यादीत तब्बल ३२ हजारांहून अधिक मतदारांची दुबार नोंद झाल्याचा मनसेचा दावा. महापालिका निवडणुकीपूर्वी या गोंधळामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Alisha Khedekar

कल्याण ग्रामीण मतदारसंघात ३२,३४५ मतदारांची दुबार नावे असल्याचा मनसेचा दावा

मतदार यादीतील गोंधळामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

मनसेने कल्याण प्रांत कार्यालयात निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली

निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी या नावांची तात्काळ पडताळणी करण्याची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल मंगळवारी वाजलं. त्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून, कार्यकर्त्यांच्या पळवापळवीसोबतच आता प्रभागातील याद्यातून मतदार खेचाखेचीदेखील सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता कल्याण ग्रामीण मतदारसंघात तब्बल ३२ हजारांहून अधिक दुबार मतदार असल्याचं मनसेने दावा करत निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतील मोठ्या अनियमिततेचा मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण ग्रामीण या मतदारसंघातील तब्बल ३२,३४५ मतदारांची नावे दुबार नोंद झाल्याचा दावा करत निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांनी ही दुबार मतदारांची यादी कल्याण प्रांत कार्यालयास सादर केली असून, या नावे तातडीने वगळावीत, अशी मागणी केली आहे. दुबार नावे कायम ठेवल्यास मतदान प्रक्रियेवर संशय निर्माण होईल, आणि बोगस मतदानाचीही शक्यता नाकारता येणार नाही असे मनसे कडून सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले की,मतदार यादीत प्रचंड गोंधळ असून एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी असल्याची अनेक उदाहरणे आहेत. प्रशासनाने निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी तात्काळ कारवाई करून या नावांची पडताळणी करून वगळणी करावी. अशी मागणी मनसे कडून करण्यात आली .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT