Raj Thackeray
Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ होण्याची शक्यता: सूत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: राज ठाकरे यांनी मशिदींवरील स्पीकर हटवण्याचा मुद्दा हाती घेतला आहे, यामुळे अनेक संघटनांकडून त्यांना धमकी दिली जात आहे. या संपूर्ण संदर्भात केंद्र सरकार त्यानं विशेष सुरक्षा देऊ शकते. धमक्यानंतर केंद्र सरकार विशेष सुरक्षा पुरवणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या अगोदर त्यांना विशेष सुरक्षा केंद्र सरकार देणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

भोंग्या बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामुळे राजकीय वातावरण तापलेले असताना आता केंद्र सरकार राज ठाकरे यांचा सुरक्षा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेश दौऱ्या आधी केंद्राकडून मिळण्याची शक्यता आहे.

एवढेच नाही तर राज ठाकरे हे पाच जून रोजी अयोध्या दौरा करत आहेत. या दरम्यान योगी सरकार देखील राज ठाकरे यांना दौऱ्याच्या दरम्यान अधिक सुरक्षा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या राज्य सरकारची वाय प्लस (Y+) सुरक्षा आहे. त्यात आता केंद्र सरकार देखील राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्याच्या विचारात आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, मधल्या काळात राज ठाकरे यांना झेड प्लस (Z+) सेक्युरिटी होती. त्यानंतर सरकारडून अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली, तेव्हा राज ठाकरे यांचीही सुरक्षा कमी (Downgrade) करण्यात आली होती. मात्र आताच्या ताज्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून विशेष स्वरूपाची सुरक्षा दिली जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Mega Block News: लोकल प्रवाशांनो, कृपया इथं लक्ष असू द्या! रविवारी नेमका कोणकोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या सविस्तर

Summer Tips: उन्हामुळे चेहरा काळवंडलाय? फॉलो करा या 5 टिप्स

Gurucharan Singh: 'गुरुचरणची तब्येत ठीक नसायची, जास्त खात नव्हता'; सोढी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या जवळच्या मैत्रिणीने बरंच काही सांगितलं

Sushma Andhare | गायकीच्या क्षेत्रासाठी अमृता फडणवीस यांना शुभेच्छा- सुषमा अंधारे

Swine Flu : स्वाईन फ्लूचा मालेगावमध्ये शिरकाव; दोघांचा मृत्यू, नागरिकांमध्ये घबराट

SCROLL FOR NEXT