हिंदूंनी ४ मुलांना जन्म द्यावा; दोन RSS आणि VHP साठी...; साध्वी ऋतंभरांचे वादग्रस्त वक्तव्य

'आता प्रत्येक हिंदूना किमान ४ मुलं असायला पाहिजेत आणि या ४ मुलांपैकी दोन मुलांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) किंवा विश्व हिंदू परिषदेकडे सोपवावी.'
Sadhvi Ritambhara
Sadhvi RitambharaSaam TV

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर (Kanpur) येथे विश्व हिंदू परिषदेने (VHP) रामोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, आता प्रत्येक हिंदूला ४ मुले झाली पाहिजेत. तर या चार पैकी दोन मुलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) किंवा विश्व हिंदू परिषदेकडे सोपवायला हवीत असंही त्या म्हणाल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर येथे विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या रामोत्सव कार्यक्रमादरम्यान साध्वी ऋतंभरा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या. 'आता प्रत्येक हिंदूना किमान ४ मुलं असायला पाहिजेत आणि या ४ मुलांपैकी दोन मुलांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) किंवा विश्व हिंदू परिषदेकडे सोपवावे जेणेकरून ते राष्ट्रासाठी योगदान देऊ शकतील, तसंच उरलेली दोन मुलं घरादाराकडे लक्ष ठेवू शकतात असं साध्वी ऋतंभरा म्हणाल्या.

हे देखील पहा -

दरम्यान, या रामोत्सव कार्यक्रमाविषयी बोलताना साध्वी पुढे म्हणाल्या 'रामोत्सवात हजारो श्रीराम रूपांची पूजा करण्यात आली आहे. अशा सुंदर प्रसंगी रामाचे भक्त होणं हे सौभाग्यच आहे. रामभक्त होण्यासाठी रामत्व आत्मसात करावे लागते कारण राम हे अपराजित पौरुषत्वाचे प्रतीक असल्याचं त्या म्हणाल्या तसंच देशातील राजकीय पक्षांनी हिंदूंमध्ये फूट पाडली, पण श्रीरामाचे आचरण संपूर्ण समाजाला एकत्र आणेल असही त्या म्हणाल्या.

यासोबतच साध्वी म्हणाल्या, 'रामोत्सवात हजारो श्रीराम रूपांची पूजा करण्यात आली. या सुंदर प्रसंगी रामाचे भक्त होणे ही भाग्याची गोष्ट असून रामभक्त होण्यासाठी रामत्व आत्मसात करावे लागते, कारण राम हे अपराजित पौरुषाचे प्रतीक आहे.

दरम्यान, या आधी देखील अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेश प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी 'हिंदु बहुसंख्य असल्याने भारत हा लोकशाही देश आहे. परंतु मुस्लिम योजनाबद्ध पद्धतीने अनेक मुलांना जन्म देऊन त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत, असा दावा त्यांनी हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील मुबारकपूर येथे संघटनेच्या 3 दिवसीय ‘धर्म संसद’च्या पहिल्या दिवशी केला. “म्हणूनच, आमच्या संस्थेने भारताला इस्लामिक राष्ट्र होऊ नये म्हणून हिंदूंना अधिक मुलांना जन्म देण्यास सांगितले आहे. असं सांगितलं होत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com