MNS Raj Thackeray Meet CM Eknath Shinde Today : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे हे सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाणार आहे. आज संध्याकाळी साडे सहा वाजता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतील. यानंतर वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं दर्शन सुद्धा घेणार आहे. (Raj Thackeray News)
अगदी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी शिवतीर्थावरील बाप्पाचं दर्शनही घेतलं होतं. यानंतर माध्यमांसोबत बोलताना ही भेट राजकीय नव्हती असं शिंदेंनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंबासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमधील भेटीगाठी वाढत असल्याने राजकीय वर्तुळातून तर्क वितर्क लावले जात आहेत. (Eknath Shinde News)
मनसे-शिंदे गट एकत्र येणार?
दरम्यान, राज्यातील सत्तांतरादरम्यान राज ठाकरे यांनी भाजपला आणि शिंदे गटाला मदत केली होती. राज्यसभा, विधानपरिषद किंवा विधानसभा अध्यक्ष असो शिंदे आणि राज ठाकरेंची जवळकी आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय.
दसरा मेळाव्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना विशेष अतिथी म्हणून बोलवण्याच्या चर्चा होत्या. मात्र काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना सध्या तरी असा विचार नसल्याचे सांगितले. मात्र, दसरा मेळाव्यात हे दोघे नेते एकत्र येतील का? हे पाहावे लागेल.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.