Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्रींच्या कारचा अपघात कशामुळे झाला? समोर आली महत्वाची माहिती

पोलिस तपासात अपघाताचे नेमके कारण समोर आले आहे.
Cyrus Mistry Death News
Cyrus Mistry Death News saam tv
Published On

Cyrus Mistry Death Case : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं रविवारी दुपारच्या सुमारास कार अपघातात निधन झालं. अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने येत असताना पालघरजवळ मिस्त्री यांच्या कारचा अपघात झाला. अपघातावेळी गाडीत चार जण होते. यामध्ये मिस्त्री यांच्यासह पंडोले नामक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला असून तपासात अपघाताचे नेमके कारण समोर आले आहे.

Cyrus Mistry Death News
Petrol Diesel Prices : वाहनधारकांना दिलासा! 'या' शहरात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

पोलिसांच्या प्राथामिक तपासानुसार, हा अपघात अतिवेगामुळे झाल्याचं दिसून आलंय. अपघाताआधी सायरस मिस्त्री यांच्या कारने अवघ्या 9 मिनिटांत तब्बल 20 किलोमीटर इतकं अंतर कापलं होतं. याचाच अर्थ जवळपास ताशी 130 ते 140 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाने मर्सिडीज कार चालली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महामार्गावर हा अपघात झाला तेथे वाहनाची वेग मर्यादा 80 किमी आहे. तरी देखील मिस्त्री यांची कार 130 ते 140 इकत्या वेगाने धावत होती. याव्यतिरिक्त सुरूवातीच्या तपासात दोन महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करण्यात आली आहे.

पहिली गोष्ट म्हणजे सुसाट वेगामुळे हा अपघात घडला असावा. तर दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सायरस मिस्त्री हे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. शिवाय त्यांनी सीटबेल्टही लावलेला नव्हता, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे.

Cyrus Mistry Death News
Pune Crime : नगरसेविकेला ब्लॅकमेल करत मागितली २५ लाखांची खंडणी; गुन्हा दाखल

दरम्यान, सायरस मिस्त्री प्रवास करत असलेली गाडी अनाहिता पंडोले (वय-55) या चालवत होत्या. त्या एक प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट आहेत. गाडीत अनाहिता यांचे पती डेरियस पंडोले आणि जहांगीर दिनशा पंडोले देखील होते. अपघातात अनाहिता आणि त्यांचे पती यांना गंभीर दुखापत झाली आहे. दोघांवर गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, गाडी चालवत असलेल्या महिलेने दुसऱ्या एका गाडीला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच गाडीवरील नियंत्रण गेले आणि गाडी डिव्हायडरला धडकली. ज्या ठिकाणी अपघात झाला, तेथे रस्त्याच्या बाजूला एक गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने ही माहिती दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com