Pune Crime : नगरसेविकेला ब्लॅकमेल करत मागितली २५ लाखांची खंडणी; गुन्हा दाखल

जितेंद्र अशोक भोसले (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Pune Crime
Pune Crimeसागर आव्हाड
Published On

Pune Crime News : पुणे (Pune) शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करीत एका नगरसेविकेला माहिती अधिकार कार्यकर्त्याने 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर नगरसेवक पद घालवू, अशी धमकी देत ही खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत (Police) संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Todays News)

Pune Crime
Petrol Diesel Prices : वाहनधारकांना दिलासा! 'या' शहरात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

जितेंद्र अशोक भोसले (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भोसले याच्याविरुद्ध यापूर्वी खंडणीचे ३ व इतर ३ गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी नगरसेविकेच्या पतीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भोसले याने फिर्यादी यांच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करीत असल्याचे कारण सांगून त्याबाबत पुणे महानगरपालिका व पीएमआरडी येथे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, यासाठी अर्ज केले होते.

या अर्जाची तपासणी होऊन कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा पीएमआरडीने दिला होता. तरीही 'महापालिका निवडणुकीत तुमची व तुमच्या पत्नीची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करेल' अशी भीती दाखवून भोसले याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. (Pune Latest Marathi News)

Pune Crime
शरद पवारांचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपची तयारी सुरु, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बारामती दौऱ्यावर

इतकंच नाही तर संबधित व्यक्तीने 23 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेटून नगरसेविकेच्या पतीकडे 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणीही केली. हा प्रकार सातत्याने होत असल्याने अखेर फिर्यादीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्यावर काही कारवाई झाली नाही.

त्यानंतर फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यांच्या अर्जाची चौकशी करुन विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com