Raj Thackeray Latest Marathi News, MNS News
Raj Thackeray Latest Marathi News, MNS News Saam Tv
मुंबई/पुणे

राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पूर्ण

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंना (Raj Thackeray) पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू होता. त्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. १ जून रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती, मात्र, कोविड डेडसेलमुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली होती. अखेर लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली आहे. (Raj Thackeray News In Marathi)

राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पूर्ण

राज ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून त्यांना पायदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळं डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. पाय दुखण्याच्या त्रासामुळे त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, कोविड डेड सेलमुळे अॅनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर राज ठाकरेंवर लीलावती रुग्णालयात ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.

राज ठाकरे यांच्या निरोगी आयुष्यासाठी कार्यकर्त्यांकडून साकडं

राज ठाकरे यांच्यावर आज लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. पण त्याआधी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील मनसे कार्यकर्त्यांनी देवाकडे साकडं घातलं होतं. मोरया गोसावी गणपती मंदिरात आरती करून प्रार्थना केली होती. त्या आरतीसाठी शेकडो मनसैनिकांनी उपस्थिती दर्शवली होती. तसंच पुण्यातील भीमाशंकर येथेही पूजा पार पडली. शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी भीमाशंकरमध्ये अभिषेक करण्यात आला. तसेच मनसैनिकांनी सुप्रसिद्ध शारदा गणपतीला महाआरती करून ५५० नारळाचे तोरण अर्पण केले होते.

वाढदिवसाला कार्यकर्त्यांचा भेटीगाठी टाळल्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी ५४ वा वाढदिवस होता. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी टाळल्या. 'माझी शस्त्रक्रिया होत असल्याने मी माझ्या वाढदिवसाला कोणालाही भेटू शकणार नाही,' असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना ऑडिओ क्लिपद्वारे दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News: अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंना निवडणूक आयोगाची नोटीस; आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Social Media मध्ये नेत्यांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ केला पोस्ट, दाेन गुन्हे दाखल

Samruddhi Highway Accident: 'समृद्धी'वर अपघातांची मालिका थांबेना! सलग पाचव्या दिवशी भीषण अपघात; ४ जण जखमी

MI vs SRH: टीम इंडियासाठी गुड न्यूज! सूर्यासह संघातील हे स्टार खेळाडू फॉर्ममध्ये परतले

World Asthama Day 2024: दमा असलेल्या रुग्णांनी व्यायाम करताना ही काळजी घेणे आवश्यक; अन्यथा वाढतील अडचणी

SCROLL FOR NEXT