डोंबिवली (raju patil latest marathi news) : विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad election 2022) दहा जागांसाठी मतदानास आज (साेमवार) सकाळी प्रारंभ झाला आहे. सुमारे 203 आमदारांनी दुपारी 12 वाजेपर्यंत या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) भाई जगताप आणि भाजपच्या (bjp) प्रसाद लाड यांच्यातील लढत चूरशीची मानली जात आहे. या निवडणुकीत मविआ आणि भाजप यांची प्रतिष्ठापणास लागली आहे. दरम्यान मनसेचे (mns) एकमेव आमदार राजू (raju patil) यांनी रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरेंची रुग्णालयात भेट घेऊन सविस्तर केल्याचे त्यांनी साम टिव्हीशी बाेलताना सांगितले. (Maharashtra Vidhan Parishad election 2022 News updates)
राज्य सभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे खूप चर्चेत आले होते. त्यांचे मत भाजपला गेल्याची देखील खुप चर्चा रंगली होती. आज (साेमवार) सकाळी आमदार राजू पाटील हे घराबाहेर पडताच त्यांना माध्यमांनी गाठले. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बाेलताना आमदार राजू पाटील यांनी विधान परिषदेच्या मतदानाबाबतचा सस्पेन्स वाढविला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. (Maharashtra Legislative Council Election 2022 News Updates)
विधान परिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने रवाना हाेण्यापुर्वी आमदार राजू पाटील म्हणाले गेल्या वेळेस आम्ही व्यक्ती पाहून मतदान केले हाेते. त्यावेळी राज साहेबांची काहींनी भेट घेतली हाेती. काल रात्री मी राज साहेबांना (राज ठाकरे) भेटलाे. त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मतदान हाेईल. दरम्यान त्यापुर्वी राजू पाटील म्हणाले काेणी आम्हांला गृहीत धरु नये की आम्ही भाजपला मतदान करु अथवा दूस-या पक्षास मतदान करु. लाेकशाहीत मताला खूप महत्व आहे. राज साहेबांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही हाेईल असे पाटील यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.