Raj Thackeray News  Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

Raj Thackeray News : निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत आणि नगरपरिषदेची निवडणूक ईव्हीएमवर होणार आहे. यावरून राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

Vishal Gangurde

राज ठाकरे यांची निवडणूक आयोगावर टीका

आयोगाला संविधानात दिलेली स्वायत्तता फक्त कागदोपत्री असल्याचा ठाकरेंचा आरोप

निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्याबद्दल राज ठाकरेंकडून पत्रकारांचे अभिनंदन

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीची घोषणा केली. ही निवडणूक ईव्हीएमवर होणार आहे. एकीकडे विरोधक मतदारयादीत सुधारणा करण्याची मागणी करत असताना आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं की, मला आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप कोणीतरी पाठवली. ती व्हिडिओ क्लिप पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. आता माझी १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे'.

'दुबार मतदार नोंदणी ते मतदारयादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोग एकही उत्तर देत नाही किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

'जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत. आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदाचं करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही व्हिडिओ क्लिप जरूर पहावी. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन, असं त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

Matar 5 Dishes : हिवाळ्यात आवर्जून बनवा मटारच्या या ५ डिशेस

Mumbai Travel : नवीन वर्षात ट्रेकिंगसाठी खास लोकेशन, मुंबईपासून जवळ आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Dusky Skin Makeup Tips: सावळ्या रंगाच्या त्वचेवर अशा पद्धतीने करा मेकअप; चेहऱ्यावर दिसेल नॅचरल ग्लो

SCROLL FOR NEXT