Raj Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : 'आपल्या देशात कलाकारांची नावे कुठे देतात?' राज ठाकरे स्पष्टच बोलले

'आपल्या देशात कलाकारांची कुठे नाव देतात का? फक्त चौकाला देतात', अशा शब्दात खंत देखील व्यक्त केली.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Raj Thackeray : रंगभूमीवरचे सुपरस्टार प्रशांत दामले यांनी १२५०० प्रयोग साकारल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या ऐतिहासिक प्रयोगानंतर मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावली. राज ठाकरे यांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरे यांनी मराठी मनोरंजनसृष्टीवर भाष्य केलं. तसेच 'आपल्या देशात कलाकारांची कुठे नाव देतात का? फक्त चौकाला देतात', अशा शब्दात खंत देखील व्यक्त केली. (laterst Marathi News)

अभिनेते प्रशांत दामले यांच्या ऐतिहासिक १२५०० प्रयोगानिमित्त त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी दर्शवली. यावेळी राज ठाकरे प्रेक्षकांशी संवाद साधला.

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, 'आज प्रशांत दामले 12 हजार 500 वा प्रयोग करतात आणि तोही क्षणमुखानंदमध्ये करतात ही सोपी गोष्ट नाही. मराठी माणूस हा नाटक वेडा आहे. मराठी महिला सिनेमासाठी नटून थटून जात नाहीत. त्या नाटकाला जातात'.

'आज मोठ्या कलाकाराचे सत्कार करायला मोठी लोक उरलेली नाहीत म्हणून आम्हाला बोलावलं जात. मुख्यंमत्री येऊन गेले. उपमुख्यमंत्री, आमचे दोन-तीन कार्यक्रम झाले'. यावेळी राज ठाकरे यांनी कलाकराच्या (Artist) मानसन्मानाविषयी देखील भाष्य केलं. 'आपल्या देशात कलाकरांची कुठे नाव देतात का? फक्त चौकाला', असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी कलाकारांच्या मानसन्मानाविषयी खंत निर्माण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Maharashtra Rain Live News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे, दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी, VIDEO

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला; रस्ता ब्लॉक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडापावला मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

SCROLL FOR NEXT