Raj Thackeray Meet Eknath Shinde Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray Meet Eknath Shinde: CM एकनाथ शिंदे- राज ठाकरे यांच्यात टोलच्या मुद्द्यावर 2 तास चर्चा, बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

Raj Thackeray Meet Eknath Shinde: टोलच्या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा केली.

सूरज सावंत

Raj Thackeray Meet Eknath Shinde:

राज्यात टोलचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय पटलावर आला आहे. टोलच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मनसेचं आंदोलन सुरू आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

टोलच्या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा केली. या चर्चेत राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातील टोलनाक्यांसंबंधित अनेक प्रश्न मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात आज गुरुवारी दोन तास बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातील टोलनाक्यांवरील शौचालय व अस्वच्छतेकडे मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधून घेतले.

राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी संबधित शासकिय अधिकाऱ्यांना या टोल नाक्यावरील शौचालयाची दुरूस्ती व स्वच्छता तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी टोल नाक्यांवर स्वतंत्र्य शौचालयाची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

ठाणे व ऐरोलीमधील टोल नाक्यांवर अवघ्या दीड किलोमीटरचं अंतर आहे. मग इतक्या अंतरासाठी टोल का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत टोल नाका कंत्राट घेतलेल्या कंपनींना नियोजन करून वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

टोल नाक्याजवळ असलेली एक सोसायटी मुंबईत आहे. मात्र, या सोसायटीतील रहिवाशांनाही टोल देऊन जावं लागतं. त्या सोसायटीतील रहिवाशांसाठी टोल माफ करण्यात यावा, याबाबतही शिंदेंनी सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच ठाण्यातील रहिवाशी हे दररोज कामानिमित्त मुंबईत प्रवास करतात, त्यांनाही टोल माफी मिळावी हा विषय राज ठाकरे यांनी मांडल्याचे कळते आहे. मात्र, याबाबत आढावा बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : माझ्या मागून आलेले मंत्री झाले, अजून किती दाढी पिकवायची? निलेश राणेंची खदखद!

Sun Transit 2024: सूर्याच्या गोचरमुळे 'या' राशी जगणार राज्यासारखं आयुष्य; अचनाक बनू शकणार गडगंज श्रीमंत

Maharashtra Politics : बंडखोरांचा सांगली पॅटर्न यशस्वी होणार? राज्यात पुन्हा १९९५ ची पुनरावृत्ती होणार?

IND vs SA: हार्दिकचं टेन्शन वाढणार! हा स्टार ऑलराऊंडर पहिल्याच सामन्यात करु शकतो पदार्पण

Sharda Sinha : प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT