Raj Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: 'सध्या कोणीही उठतो अन् इतिहासकार होतो' पुण्यात राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी, राजकीय नेत्यांना दिला 'हा' मोलाचा सल्ला

पुण्यात झालेल्या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात व्यंग, वास्तव, राजकारण या विषयांवर राज ठाकरे (raj thackeray) यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी सध्याचे देशातील तसेच राज्याच्या राजकारणावर सडकून टीका केली.

Gangappa Pujari

Dnyaneshwar Hingolikar, Pune: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहेत. यावेळी पुण्यात झालेल्या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात व्यंग, वास्तव, राजकारण या विषयांवर राज ठाकरे (raj thackeray) यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी सध्याचे देशातील तसेच राज्याच्या राजकारणावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचलेलेही पाहायला मिळाले. (Pune News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अठराव्या जागतिक मराठी संमेलन सध्या पुण्यात पार पडत आहे. याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी "माध्यमांनी रस्ते पाणी, अशा महत्वाच्या प्रश्नांवर लक्ष दिले पाहिजे, पवार काय बोलले, राऊत काय बोलले हे दाखवणे थांबवले पाहिजे," असा सल्लाही माध्यमांना दिला.

राज्याबाहेर जाणारे प्रकल्प यावर बोलताना राज ठाकरेंनी "एक दोन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने फारसा फरक पडत नाही, त्याचबरोबर देशात एकाच राज्यावर जास्त लक्ष दिले जाते हे बरोबर नाही, अशी भूमिका मीच मांडली होती, त्यानंतर त्यावर सगळे शहामृगासारखे गोळा झाले," असा खुलासा यावेळी केला.

राज्यात महापुरुषांवर होणाऱ्या अपमानावरही राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. "सध्या कोणीही इतिहासकार होत आहे, कोणीही काहीही बोलत आहे. राज्यातील राजकीय स्थिती एवढी लयाला गेली आहे. जातीजातीत तेढं निर्माण करण, महापुरूषांबद्दल बोलणं हे राजकारण नव्हे. राजकारण अगदी मुक्त असलं पाहिजे, दोन द्याव्या तर दोन घ्याव्या," असा सल्लाही राज ठाकरेंनी यावेळी राजकीय नेत्यांना दिला.

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या लाव रे व्हिडिओवर ही खुलासा केला. २"०१४ नंतर ज्या गोष्टी देशात घडल्या त्यावर टीका म्हणून ती मोहिम होती. मात्र नंतरच्या काळात देशात कलम ३७० रद्द करणे, राममंदिराचा प्रश्न मार्गी लागणे अशा चांगल्या गोष्टी घडल्या, त्यावर कौतुक करायला नको का?" असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : इंजिनाचा वेग मंदावला! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

SCROLL FOR NEXT