मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंना (Raj Thackeray) पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू होता. त्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. १ जून रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती, मात्र, कोविड डेडसेलमुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली होती. अखेर २० जुनला त्यांच्यावर लीलावती रुग्णालयातयशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली आहे.
त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक ट्वीट केलं आहे. ट्वीट करत त्यांनी आपल्या शस्त्रक्रियेबाबत महत्वाची माहिती दिली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना आपण आता घरी परतलो आहोत, असे देखील राज ठाकरे यांनी ट्विट करत सांगितलं आहे.
राज ठाकरे यांचं ट्विट
जय महाराष्ट्र! आपल्या आशीर्वादाने आणि प्रेमाने माजी शस्त्रक्रिया व्यस्थितरित्या पार पडली! काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे! आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असो! असे ट्विट राज ठकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेराज ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून त्यांना पायदुखीचा त्रास जाणवत होता. शस्त्रक्रियासाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या हिप बोनचं ऑपरेशन करण्यात आलं आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी देवाकडेही साकडं घातलं होतं.
अखेर राज ठाकरे आता ठणठणीत बरे होऊन आता घरी परतले आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत याची माहिती दिली आहे. डॉक्टरांना त्यांना सध्या आराम करण्याचा सल्ला दिला आहे. घरी परतलेल्या राज ठाकरेंनी अजूनही सध्याच्या राजकीय भूकंपावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या संपूर्ण घडामोडींवर राज ठकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.