मावळात भाताचे रोपे करण्यास सुरुवात; मात्र पाऊस नाही, शेतकऱ्यांची चिंता वाढली...

मावळात शेतकऱ्यांची सर्वात जास्त पसंती इंद्रायणी या वाणाला आहे
Maval news
Maval newsSaam Tv
Published On

मावळ -सहयाद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या मावळात यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. राज्यात सर्वात जास्त पर्जन्यमान असणारा तालुका म्हणून मावळाची ओळख आहे,जूनच्या अखेरीस वीस ते पंचवीस टक्के पाऊस बरसत असतो. मात्र निसर्गाचा लहरीपणाने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु पाऊस हवा तसा पडेना त्यामुळे शेतकऱ्यांनसह (Farmer) मावळ कृषी खाते ही हवालदिल झालंय,तालुक्यात शेतीत अनेक नवं नवीन प्रयोग एसआरटी पद्धत वेळोवेळी शेतकऱ्यांना शेतीवरच शाळा भरवून मार्गदर्शन केले जाते तर कमी मेहनत मात्र पिकं जास्त कसं घेता येईल याच ज्ञान सध्या मावळातील (Maval) शेतकऱ्यांना देणं सुरू आहे.

हे देखील पाहा -

मावळात भात पिकाचे क्षेत्र जवळपास 13,500 हेक्टरी आहे. त्यात नियंत्रित भात लागवड पद्धतीने 4000 हेक्टर भात लागवड होते. एसआरटी पद्धतीने 200 हेक्टरी यांत्रिकीकरण भात लागवड 100 हेक्टर पद्धतीने भात लागवड केली जाते त्यामुळे पिकांची वाढ होऊन नवीन तंत्रज्ञान वापरल्याने 25 ते 30 % टक्के उत्पादनात वाढ होते. मावळात शेतकऱ्यांची सर्वात जास्त पसंती इंद्रायणी या वाणाला आहे. मावळ हे भाताचे आगार समजले जाते इंद्रायणी सह फुले समृद्धी, आंबेमोहर या वाणाची भात लागवड केली जाते. दत्ता गावडे आणि विकास गोसावी या कृषी अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केल आहे.

Maval news
सत्ता स्थापनेच्या जोरदार हालचाली; शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी भरत गोगावले, बच्चू कडू

मावळात पावसाच्या एक दोन दमदार सरी येऊन गेल्यात त्यामुळेच शेतकऱ्यांची लगबग पेरणी मशागतीच्या कामाला दिसून आलीये,पेरणी वेळेत पूर्ण झाली नसल्याने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला जाता आलं नाही,मात्र पाऊस येईल याच आशेवर पांडुरंगाला बळीराजा साकडं घालत आहे,या कष्टकरी शेतकऱ्यांन साठी पाऊस येणं तितकंच महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com