Raj Thackeray and Uddhav Thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Video : हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर एकतरी केस आहे का? राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

साम टिव्ही ब्युरो

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मराठी आणि हिंदुत्वच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. ' एकनाथ शिंदेंनी रात्रीतून कांडी फिरवली आणि सत्तांतर घडवलं. आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरत आहे. मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर एकतरी केस आहे का? भूमिका घ्यायच्या नाहीत. फक्त यांना सत्ता हवी आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्ष मेळाव्याला संबोधित केले. या मुंबईच्या गोरेगावात राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राज ठाकरे म्हणाले, 'मला वातावरणात निवडणुक दिसत नाही. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये निवडणुका लागतील असं बोललं जात आहे. ज्यावेळी तुम्ही रस्त्यावर फिरत असतो. त्यावेळी तो गटाध्यक्ष नसतो किंवा मनसे सैनिक नसतो, तो राज ठाकरे असतो'.

'महाराष्ट्रात जो काही खोळंबा झाला आहे की त्यामुळे काय होईल हे सांगता येत नाही. सर्वसाधारण फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका लागतील असं आपण पकडून चालूया. मनसेला आज १६-१७ वर्ष झाली. या दरम्यान आपण जी आंदोलनं केली, ज्या भूमिका घेतल्या त्यात आपल्याला इतर पक्षांपेक्षा सर्वात जास्त यश आलं आहे. मात्र मनसेकडून जी आंदोलनं होतील ते लोकांच्या विस्मरणात कसे जाईल यासाठी काही यंत्रणा काम करत होत्या, असे राज ठाकरे म्हणाले.

'टोलच्या आंदोलनात अनेकांना अटक झाली. या आंदोलनानंतर राज्यातील ६५हून अधिक टोल बंद झाले. आपण एक पुस्तिका काढत आहोत. ज्यामध्ये गेल्या १६ वर्षात किती आंदोलनं केली. ती कशी यशस्वी झाली याचा आढावा या पुस्तकात असणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT