गेल्या १६ वर्षातील आंदोलनांची पुस्तिका काढणार, यशाचा आढावा घेणार; राज ठाकरेंनी केली घोषणा

ज्यामध्ये गेल्या १६ वर्षात किती आंदोलनं केली. ती कशी यशस्वी झाली याचा आढावा या पुस्तकात असणार आहे, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली.
Raj Thackeray
Raj Thackeray saam tv
Published On

Raj Thackeray News : 'महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या आंदोलनानंतर राज्यातील ६५हून अधिक टोल बंद झाले. आपण एक पुस्तिका काढत आहोत. ज्यामध्ये गेल्या १६ वर्षात किती आंदोलनं केली. ती कशी यशस्वी झाली याचा आढावा या पुस्तकात असणार आहे, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. (Latest Marathi News)

Raj Thackeray
'आमच्या पायाखालची वाळू...';मुख्यमंत्र्यांच्या टीकेला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्ष मेळाव्याला संबोधित केले. या मुंबईच्या गोरेगावात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राज ठाकरे म्हणाले, 'मला वातावरणात निवडणूक दिसत नाही. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये निवडणुका लागतील असं बोललं जात आहे. तुम्ही ज्यावेळी रस्त्यावर फिरत असतो. त्यावेळी तो गटाध्यक्ष नसतो किंवा मनसे सैनिक नसतो, तो राज ठाकरे असतो'.

'महाराष्ट्रात आता जो काही खोळंबा झाला आहे की त्यामुळे काय होईल हे सांगता येत नाही. सर्वसाधारण फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका लागतील असं आपण पकडून चालूया. मनसेला आज १६-१७ वर्ष झाली. या दरम्यान आपण जी आंदोलनं केली, ज्या भूमिका घेतल्या त्यात आपल्याला इतर पक्षांपेक्षा सर्वात जास्त यश आलं आहे. मात्र मनसेकडून जी आंदोलनं होतील ते लोकांच्या विस्मरणात कसे जाईल यासाठी काही यंत्रणा काम करत होत्या, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
MNS News: राज ठाकरेंचं टेन्शन वाढणार? वसंत मोरेंनंतर मुंबईतील नेता नाराज; मनसेच्या मेळाव्याला दांडी

'टोलच्या आंदोलनात अनेकांना अटक झाली. या आंदोलनानंतर राज्यातील ६५हून अधिक टोल बंद झाले. आपण एक पुस्तिका काढत आहोत. ज्यामध्ये गेल्या १६ वर्षात किती आंदोलनं केली. ती कशी यशस्वी झाली याचा आढावा या पुस्तकात असणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com