Raj Thackeray News  Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : अशोक सराफ दक्षिणेत असते तर...'; राज ठाकरे राज्याच्या राजकीय स्थितीवर स्पष्टच बोलले

कार्यक्रमात संबोधित करताना राज ठाकरे यांनी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कारकिर्दीवर भाष्य केलं.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Raj Thackeray News : पुण्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त 'अशोक पर्व' या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात संबोधित करताना राज ठाकरे यांनी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कारकिर्दीवर भाष्य केलं.

'अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणे मध्ये असती, तर आज मुख्यमंत्री असते. त्यांचा दुग्धाभिषेक झाला असता. मात्र आपल्याकडे असे काही नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. (Latest Marathi News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अशोक सराफ यांचा उल्लेख सर असा केला. राज ठाकरे म्हणाले, 'अशोक सर बोलताना मला वाटलं माझीच ७५ वर्ष पूर्ण झाली. लहान असल्यापासून त्यांना आम्ही पाहिलं. त्यांनी मला आवडतं म्हटलं हे यामुळे भरून पावलो'.

'एकमेव अभिनेते असावेत की खाली कोणी असावेत, याचा अशोक सराफ यांना फरक पडला नाही. ५०-६० वर्ष स्वतः बद्दल कुतवहल जागृत ठेवणं सोपी गोष्ट नाही. विनोद ही गोष्ट सोपी गोष्ट नाही. दीड-दोन वर्षांनी विनोदी नाटक, चित्रपटमध्ये काम करणाऱ्या विनोदवीरामध्ये किती ताकद असेल. अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिण भागात असती, तर आज मुख्यमंत्री असते. अशोक सराफ यांचा दुग्धाभिषेक झाला असता. आपल्याकडे असं काही नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

'आपल्याकडे कलाकाराच्या नावाने चौक असतात. परदेशात कलाकाराच्या नावाने एअरपोर्ट आहे. मोठ्या माणसाच्या हस्ते सत्कार करायला मोठे माणसं राहिली नाहीत म्हणून आम्हाला आटोपावा लागतोय. कलाकार नसते तर देशात कधीच अराजकता आली असती. मी विचार करत होतो हा दागिना सरफाच्याच घरी मिळू शकतो, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT