महाराष्ट्राला जातीपातीतून बाहेर काढणार; राज ठाकरेंनी अमेरिकेतून सांगितला प्लान
Raj Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : महाराष्ट्राला जातीपातीतून बाहेर काढणार; राज ठाकरेंनी अमेरिकेतून सांगितला प्लान

Vishal Gangurde

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी अमेरिकेत सॅन होजेला येथील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावली. या अधिवेशनातील मुलाखतीत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, भाषेवर मत मांडलं. तसेच यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्राला जातीपातीतून बाहेर काढणार असल्याचाही निर्धार केला. यासाठी राज ठाकरेंनी प्लान देखील सांगितला. याविषयाची पोस्टच राज ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशनातील मुलाखतीविषयी माहिती दिली. तसेच एक्स मीडियावर पोस्ट करत देखील राज ठाकरेंनी यबाबत माहिती दिली.

'अमेरिकेत सॅन होजेला येथील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरुये. या अधिवेशनाला उपस्थित रहावं, अशी विनंती आयोजकांनी केली होती. यामुळे त्यांचा मान राखला. त्यानंतर मी सॅन होजेला आलो. यावेळी माझी एक मुलाखतही ठरली होती. शुक्रवारी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी माझी मुलाखत घेतली. बऱ्याच काळाने महाराष्ट्राबाहेरील मराठी जणांना भेटण्याचा योग आलाय. महाराष्ट्राबाहेरील नागरिक राज्याकडे कसं बघतात हे समजून घेता आलं, असे राज ठाकरेंनी सांगितले.

'भारताबाहेर अनेक मराठी माणसे आहेत. त्यांनी तिथे त्यांचं जग उभं करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनी या प्रवासात अनुभव गोळा केला आहे. जगातील उत्तम कल्पना पाहिल्या असतील, त्यांना महाराष्ट्रात आणाव्यात असं वाटत असेल, तर त्यांनी आणण्यासाठी पूर्ण शर्थीने प्रयत्न करावेत, असे राज ठाकरे म्हणाले.

'महाराष्ट्र आज जातीपातीत अडकला आहे. तरी या महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेरपणे निघेल. या महाराष्ट्राला यातून बाहेर काढेन. यासाठी महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी माणासांना जोडणारा दुवा हा मराठी भाषा. या माणसांनी मराठी भाषेला विसरता कामा नये. ज्या ठिकाणी मराठी माणसं एकत्र येतील, त्या ठिकाणी मराठीत बोललं पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

'दोन मराठी माणसांनी आपल्या भाषेत बोलल्याने जातीच्या भिंती निघून जातील. त्यानंतर 'मराठी' म्हणून आपला एकसंध समाज उभा राहील. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न केले पाहिजे, असेही राज ठाकरेंनी मुलाखतीत सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi : विधानसभेच्या तयारीसाठी राहुल गांधी बणणार वारकरी; महायुतीत अस्वस्थता

Tourism Tips: One Day Trip करण्यासाठी हे ठिकाणं आहेत बेस्ट

Vastu Tips: झाडू वापरताना चुका नका करू, नाहीतर येईल दारिद्र्य

Zika Virus Symptoms VIDEO: झिकाकडे दुर्लक्ष कराल,जीवाला मुकाल? महिलांना सर्वात जास्त धोका? जाणून घ्या लक्षणे

VIDEO: ठाकरे शिंदेंना धक्का देणार? नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी काय आहे मास्टर प्लॅन? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT