Maharashtra Assembly Election: राज ठाकरे स्वबळावर लढणार? विधानसभेसाठी 250 जागांची तयारी

MNS Raj Thackeray May Contest for 250 Seats in Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणा-या राज ठाकरेंनी आगामी विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिलाय. मनसे तब्बल 250 जागांवर तयारी करणार असून लवकरच या मतदारसंघांची चाचपणी करण्यात येणार आहे. एवढंच नाही, तर मुस्लिमांच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंना घेरण्याची रणनीतीही राज ठाकरेंनी आखलीय. यावरचा हा विशेष रिपोर्ट
Maharashtra Assembly Election: राज ठाकरे स्वबळावर लढणार? विधानसभेसाठी 250 जागांची तयारी
Raj ThackerayFacebook

विनोद पाटील,साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणा-या मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलीय. राज ठाकरेंनी आपल्या पदाधिका-यांचा मुंबईत मेळावा घेतला. या मेळाव्यात पदाधिका-यांनी स्वबऴावर लढण्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे लोकसभेत काहीसे नाराज झालेल्या मनसैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी राज ठाकरेंनीही थेट 250 जागांवर तयारी करण्याचे फर्मान सोडले. या बैठकीत नेमकं काय झालं ते पाहूयात.

मनसेची विधानसभेसाठी स्वबळाची रणनीती?

मनसे विधानसभा स्वबळावर लढण्याची शक्यता

विधानसभेसाठी मनसेची 250 जागांची तयारी

मनसेच्या मेळाव्यात पदाधिका-यांची स्वबळाची इच्छा

पुढील 15 दिवसांत राज्यातील परिस्थितीची चाचपणी

जुलै अखेरपर्यंत मनसे उमेदवारांची यादी अंतिम करणार

या बैठकीत राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीतल्या ठाकरे आणि महायुतीच्या जय-परायजयाचंही विश्लेषण केलं. या बैठकीत राज ठाकरे काय म्हणालेत ते पाहूयात.

राज ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं मराठी लोकांची नाहीत.

मोदींच्या विरोधात मुस्लिम समाजानं केलेल्या मतदानाचा फायदा.

मुस्लिमांना विरोध नाही. मात्र धर्मांध देशद्रोही मुस्लिमांना तीव्र विरोध.

मविआसोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेंबाबात लोकांमध्ये राग होता.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाच्या नावावरून राजकारण झाल्यानं लोकांची भावना उद्धव सोबत.

शिंदेंना पक्ष आणि चिन्हाबाबत कल्पना दिली होती मात्र त्यांनी ऐकलं नाही .

उद्धव ठाकरेंच्या विजयाच मुस्लिमांचा वाटा असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय. तसंच मराठी मतंही उद्धव ठाकरेंपासून दूर गेल्याचं त्यांचं म्हणणंय. याच दूर गेलेल्या मराठी मतांना विधानसभेत पर्याय देण्याची राज ठाकरेंची रणनीती असल्याचं दिसतंय. त्यामुळेच महायुतीकडेही त्यांनी मुंबई-पुणे आणि नाशिक परिसरातल्या जागांवर भर दिलाय. तर गेल्या दोन विधानसभांमध्ये युती आणि आघाड्यांशी ऐनवेळी गणित न जुळल्यामुळे मनसेचा गोंधळ उडाला होता. त्यामुळे राज ठाकरे आतापासूनच स्वबळावर कामाला लागले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com