डोंबिवलीत मनसेचे खड्डे भरो आंदोलन... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

डोंबिवलीत मनसेचे खड्डे भरो आंदोलन...

डोंबिवलीत मनसेने आज खड्डे भरो आंदोलन केले. यावेळी सेना-भाजपवर मनसेने टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवलीत Dombavali मनसेने आज खड्डे भरो आंदोलन केले. यावेळी सेना-भाजपवर BJP मनसेने टीका केली आहे. यावेळी मनसेच्या MNS कार्यकर्त्यांनी हातात घमेलं, फावडा घेऊन खड्डे बुजवत आंदोलन केले. डोंबिवली एमआयडीसी मधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन आणि सत्ताधारी लक्ष देत नाही. MNS agitation in Dombivali

हे देखील पहा -

त्यासाठी मनसेने स्वखर्चातून डोंबिवली एमआयडीसी विभागात रस्त्यावर खड्डे भरो आंदोलन केले आहे. मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी सेना-भाजपवर टीका केली.

मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले की, डोंबिवली एमआयडीसी परिसरातील रस्ते दुरुस्तीसाठी ११० कोटी मंजूर झाल्याची घोषणा शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली होती.ती फक्त बॅनरवरच आहे.सध्या रस्ते खड्डेमय झाले असून त्याचा त्रास नागरिकांना आणि वाहनचालकांना होत आहे. यासाठी मनसेने आज खड्डे भरो आंदोलन केले.

यावेळी मनसे पदाधिकारी दिपीका पेडणेकर, सरोज प्रकाश भोईर,सपना पाटील, मिलिंद म्हात्रे, संदीप म्हात्रे,सुदेश चुडनाईक,प्रकाश माने,योगेश रोहिदास पाटील,अरुण जाभळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

SCROLL FOR NEXT