sanjay raut
sanjay raut Saam Tv
मुंबई/पुणे

हिम्मत असेल आमदारांनी राजीनामे द्यावेत; संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज

जयश्री मोरे

मुंबई - महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षावरून घमासान सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतुन (Shivsena) बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहेत. सध्या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. आता उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्ववभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले की, जे शिसेनेतून बाहेर गेले त्यांची शिवसेना असू शकत नाही ते जनता ठरवेल. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्ही आमच्या आमदारकीचे राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोरं जा असे ओपन चॅलेंज संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिले आहे. बंडखोर आमदारांनी आपापल्या मतदार संघात निवडून येऊन दाखवावं असंही ते म्हणाले आहेत.

हे देखील पाहा -

यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आमदारांशी आपला संपर्क झालेला असल्याचा दावा देखील केली. तिथे असाम मध्ये पूर आला आहे आणि तिथे हे लोकं पार्ट्या करत आहे असा आरोप देखील राऊत यांनी लगावला आहे.

काही आमदारांशी आता पाच मिनिटांपूर्वी माझं बोलणं झालं त्यांनी इथे यायची इच्छा व्यक्त केली आहे असा दावा राऊतांनी केला. आमदारांना तिथे जबरदस्तीने डांबून ठेवले आहे किती दिवस ते गुवाहाटीला राहनार असा पुनरुच्चार राऊतांनी केला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचे भक्त आहोत असं सांगून शिंदे गटाने पाठीत खंजीर खुपसला आहे. बाळासाहेबांच भक्त असं पाठीत खंजीर खुपसायचं काम करत नाहीत. बंडखोरी नेमकी कुठे होणार हे लवकरच कळेल, असं सूचक वक्तव्य हे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज ते मुंबईत बोलत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Making Chapati Tips : मऊ लुसलुशीत चपातीसाठी अशी मळा कणीक; दिवसभर पोळ्या राहतील मऊ

Nandurbar Police : दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त; निवडणुकीच्या काळात पोलिसांची कारवाई

T20 World Cup 2024: T-20 WC साठी बांगलादेशचा संघ जाहीर! शाकिब अल हसन नव्हे तर या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

Vastu Tips: देव्हाऱ्यात या वस्तू ठेवल्यास आर्थिक संकटातून होईल सुटका

Madhuri Dixit: 'धक धक गर्ल' माधुरीचं वय काय?

SCROLL FOR NEXT