Mumbai water issue  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईतील 'या' भागातील पाणी टंचाईची समस्या मिटणार; विंधन विहीर खोदण्याचा कामाला मंजुरी

Mumbai water issue : मुंबईतील वांद्रे भागातील पाणी टंचाईची समस्या मिटण्याची शक्यता आहे. यासाठी विंधन विहीर खोदण्याचा कामाला मंजुरी देण्यात आली आहे.

Saam Tv

वांद्रे (पूर्व) येथील पाणी टंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बोअरवेल प्रकल्पाला मंजुरी

आमदार वरुण सरदेसाई यांनी स्वत:च्या आमदार विकास निधीतून हा प्रकल्प मंजूर

विंधन विहीर खोदण्याचा भूमिपूजन सोहळा १४ सप्टेंबर रोजी होणार

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या वांद्रे (पूर्व) येथे नेहमी भासत असणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येबाबत वांद्रे पूर्वच्या नागरिकांनी आमदार वरुण सरदेसाई यांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत मागणी केली होती. वांद्रे परिसराला आवश्यक पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरिता आमदार वरुण सरदेसाई यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली होती.

सरदेसाई यांनी त्यावेळी ५ एम.एल.डी. पाणी पुरवठा वाढवून घेतला. परंतु सदर पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी साठी सोडवणे आवश्यक असल्याने आमदार वरुण सरदेसाई यांनी आपल्या स्थानिक आमदार विकासनिधीमधून वांद्रे (पूर्व) येथील नवीन शासकीय वसाहती करीता विंधन विहीर (Borewell) खोदण्याकरिता निधी तरतूद केला.

नवीन शासकीय वसाहतीमधील ६ इमारतीकरिता विंधन विहीर (borewell) खोदणे कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर भूमिपूजन सोहळा आमदार वरुण सरदेसाई यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या भूमिपूजन सोहळ्यास सर्व वांद्रे वासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना शाखाप्रमुख अरुण कांबळे यांनी केले आहे. नवीन शासकीय वसाहतीमधील नागरिकांनी त्यांच्या पाण्याच्या समस्येवर आमदार वरुण सरदेसाई यांनी कायमस्वरूपी तोडगा काढून या वसाहतीतील मुख्य पाण्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल आमदार वरुण सरदेसाई यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चालत्या बसमधून उडी घेत महिलेची आत्महत्या,छत्रपती संभाजीनगरमधील घटना

शेतकऱ्यांसाठी ऊस झाला गोड; प्रति क्विंटलमागे केली वाढ, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 30,000,000,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ?

Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन! राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत तिकीटाचे दर किती?

Satara News : सातारा डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, पीडितेच्या हात आणि पत्रावरील हस्ताक्षर जुळत नाही? ठाकरे गटाचा मोठा दावा

'१ वाजता आली, चेहऱ्यावर चिंता अन्..' 'त्या' रात्री डॉक्टर तरूणीसोबत काय घडलं? हॉटेल मालकानं सर्वच सांगितलं

SCROLL FOR NEXT