अब्रुचे नुकसान म्हणून प्रताप सरनाईक यांनी दाखल केला १०० कोटींचा दावा Saam Tv News
मुंबई/पुणे

अब्रुचे नुकसान म्हणून प्रताप सरनाईक यांनी दाखल केला १०० कोटींचा दावा

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे कोर्टात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा दाखल केला आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

ठाणे - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप केले होते. किरीट सोमय्या यांनी या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असे आमदार सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या विरोधात, ठाणे कोर्टात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना आता त्यांनी केलेल्या आरोपांबाबत कोर्टात उत्तर द्यावे लागणार आहे. (MLA pratap sarnaik claim 100 crore rupees of reputation damages against kirit somaiya)

मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांचे पती किरीट सोमय्या यांच्या राजकीय शक्तीचा वापर करून तब्बल १६ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात केल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला होता. याप्रकरणी सोमय्या पती-पत्नींवरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, आमदार सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती. तेव्हा किरीट सोमय्या यांचा शौचालय घोटाळा बाहेर निघाल्याने त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करुन माझी बदनामी करत असल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला होता. तसेच त्यावेळी किरीट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आमदार सरनाईक यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टात जवळपास ३ लाख इतकी स्टॅम्पड्युटी भरली आहे.

हे देखील पहा -

सोमय्या यांनी राजकीय द्वेषाची पातळी ओलांडून बदनामीचे घाणेरडे राजकारण केले आहे असे सरनाईक म्हणाले. त्याचप्रमाणे बेलगाम खोटी विधाने करून त्यांनी अजेंडा म्हणून बदनामीची मोहीम सुरु केली. त्यांनी ६ महिन्यात वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत धादांत खोटी वक्तव्ये व बदनामी केली आहे. त्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. खोटी विधाने आणि बातम्यांमुळे माझ्या प्रतिमेला जो तडा गेला, माझ्या इभ्रतीला जे नुकसान पोहोचले आहे, त्या नुकसान भरपाईपोटी मी विशेष दिवाणी दावा दाखल केलेला आहे व दिवाणी दाव्याचे मूल्य रक्कम १०० कोटी इतके आकारलेले आहे, असे सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT