भाजपचं हिंदुत्व 'चोरबाजार' असेल तर शिवसेनेचं हिंदुत्व 'भेंडीबाजार' - राणे 
मुंबई/पुणे

भाजपचं हिंदुत्व 'चोरबाजार' असेल तर शिवसेनेचं हिंदुत्व 'भेंडीबाजार' - राणे

शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामानच्या अग्रलेखातून थेट भाजपच्या (BJP) हिंदूत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहेत.

वैदेही काणेकर, सामटीव्ही, मुंबई

मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. भाजपचं हिंदुत्व जर चोर बाजार असेल तर शिसेनेचं हिंदुत्व भेंडी बाजार असल्याची जहरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. हिंदुत्वबाबत भाजपला बोलणाऱ्या शिवसेनेमध्ये हिंमत आहे का शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस यांच्यासमोर हिंदुत्वबाबत बोलायची असेही राणे म्हणाले आहेत.

दरम्यान शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामानच्या अग्रलेखातून थेट भाजपच्या (BJP) हिंदूत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहेत. भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा चोरबाजार असल्याचे वारंवार उघड झाले आहे अशी टीका सामनातून केली आहे. भाजपने राम मंदीराच्या नावाखाली मलिदा लाटण्याचे काम केले, भाजपला राम मंदीराच्या बाजूच्या जमिनी आपल्या खिशात घालायच्या आहेत अशी खोचक टीका सामनातून केली आहे.

थोड्यावेळापुर्वी माध्यमांशी बोलताना सामनाचे कार्यकारी संपादक बोलताना संजय राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. काल जे अयोध्येतलं प्रकरण आलेलं आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या परिवाराने जमिनी विकत घेतल्या आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी लढले कोण? मेले कोण? आणि रामाच्या नावावर पैसे जमा करते कोण? हा प्रश्न या नकली हिंदुत्ववाद्यांना विचारणे गरजेचे आहे आणि आम्ही तो विचारला आहे असे उत्तर संजय राऊतांनी दिले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT