MLA Ganpat Gaikwad Firing Saamtv
मुंबई/पुणे

Mahesh Gaikwad: टायगर इज बॅक, भावी आमदार.. महेश गायकवाड यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज; समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी

MLA Ganpat Gaikwad Firing: महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर महेश गायकवाड यांच्या समर्थकांकडून कल्याण भागात मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. १६ फेब्रुवारी २०२४

Kalyan News:

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात जखमी झालेले शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर महेश गायकवाड यांच्या समर्थकांकडून कल्याण भागात मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी जमिनीचा वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता . या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

या उपचारादरम्यान डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत होते तर दुसरीकडे महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्या दीर्घायुश्यासाठी समर्थकांकडून होम हवन, मंत्र जप केले जात होते. तब्बल तेरा दिवसानंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डीचार्ज मिळणार आहे. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महेश गायकवाड हे कल्याण मध्ये दाखल होतील यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे . शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आलेत यामधील टायगर इज बॅक, भावी आमदार आशयाचे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, आज महेश गायकवाड हे पत्रकार परिषदही घेणार आहेत, या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

SCROLL FOR NEXT