Bacchu kadu  Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News : आमदार बच्चू कडू यांना मोठा दिलासा; न्यायालयाने 'या' प्रकरणात केला जामीन मंजूर

न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार बच्चू कडू यांना आज सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता न्यायालयाने आमदार कडू यांचा जामीन मंजूर केला आहे.

सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ही कारवाई केली होती. बच्चू कडूंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणी केली. बच्चू कडू यांना विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी जामिन मंजूर केला आहे. रोख जामीनावर जामीन मंजूर केला आहे. जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची आज संध्याकाळ पर्यंत होणार सुटका होणार आहे.

मिळालेली माहिती अशी, आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने बच्चू कडू (Bacchu kadu) यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यालयाने आमदार कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. बच्चू कड आज न्यायालायासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालायने फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना न्यालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT