Bachu Kadu vs Navneet Rana Saam TV
मुंबई/पुणे

Amravati Lok Sabha: नवनीत राणांना लोकसभेचं तिकीट दिल्यास बंड करू; आमदार बच्चू कडूंचा महायुतीला इशारा

Bachu Kadu vs Navneet Rana: अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास बंड करू, असा इशारा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला आहे.

Satish Daud

Amravati Politics Bachu Kadu vs Navneet Rana

अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास बंड करू, असा इशारा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला आहे. नवनीत राणा यांच्याविषयी लोकांची प्रचंड नाराजी असून मी त्यांच्यासोबत काम करणार नाही, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी नवनीत राणा यांचे जोरकसपणे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांच्या उमेदवारीला भाजपसह शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये, अशी विनंती भाजप तसेच शिंदे गटाचे नेते पक्षातील नेत्यांकडे करीत आहेत. (Lok Sabha Election 2024)

अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. जर विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली, तर महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला दिला आहे. त्यामुळे अमरावतीत पुन्हा नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू असा वाद रंगण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले आमदार बच्चू कडू?

महायुतीतील जागावाटपासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसोबत चर्चा केली. "मी नवनीत राणा यांच्याकडून देण्यात येत असलेली वागणूक मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. जर राणा उमेदवार असतील, तर आम्हाला बंड करावं लागेल", असं बच्चू कडू म्हणाले.

नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार असतील तर आम्हाला युतीतून बाहेर पडण्याची संमती द्या, असं मत आम्ही मांडलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ४ तारखेला आपण बैठक घेऊ, असं आश्वासन दिलं आहे, असंही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

ST आरक्षणासाठी धनगर पुन्हा आक्रमक; आंदोलनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण, VIDEO

Ladki Bahin Yojana : राज्यात दीड कोटी लाडक्या अपात्र? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT