BMC School news  Saam tv
मुंबई/पुणे

BMC School : शिक्षक भरतीसाठी निधी नाही, पण शाळा इमारतींसाठी कोट्यवधींचा खर्च? काँग्रेस आमदाराने सगळंच काढलं

BMC School news : मुंबई महापालिकेच्या शाळेच्या खासगीकरणावरून काँग्रेस आमदाराने सवाल उपस्थित केले आहेत.

Vishal Gangurde

मुंबई मनपाने मालवणीतील शाळेतील काही वर्ग खासगी संस्थेला चालविण्यास दिल्याचा आरोप.

काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी या निर्णयाला तीव्र विरोध

शिक्षक भरतीसाठी निधी नाही, पण इमारतींसाठी कोट्यवधींचा खर्च का? असा शेख यांचा सवाल

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने मालवणी टाऊनशिप येथील मुंबई पब्लिक स्कूलमधील इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग खाजगी संस्थेला चालविण्यास दिल्याच्या निर्णयाला आमदार अस्लम शेख यांनी तीव्र शब्दांत विरोध केला आहे. पालिकने हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा असलम शेख यांनी आज झालेल्या पालक शिक्षक बैठकीत दिला आहे.

'पालिकेच्या शिक्षकांना बेरोजगार करून, खासगी संस्थांमार्फत शिक्षक नेमून शाळांचे खाजगीकरण करण्याचे षड्यंत्र सुरू आहे." त्यांनी प्रशासनावर ठपका ठेवत विचारले की, “इमारतींसाठी कोट्यवधी खर्च करणाऱ्या पालिकेकडे शिक्षक भरतीसाठी पैसे नाहीत का?” असा सवालही आमदार शेख यांनी उपस्थित केला आहे.

शेख यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही केली असून, “सीबीएसई वर्ग खासगी संस्थांना देणे, शिक्षक नियुक्ती खाजगी संस्थांकडून करणे, आणि यामागे असलेले संभाव्य आर्थिक हितसंबंध” यांचा तपशीलवार छडा घ्यावा, असेही ते म्हणाले.

शाळेतील सर्व वर्गांसाठी मनपा शिक्षक उपलब्ध असूनही खासगी संस्थेमार्फत शिक्षक नियुक्ती का? शिक्षणाचा दर्जा, शाळेतील विद्यार्थी संख्या व शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन यावरही गंभीर प्रश्न उपस्थित करत शेख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, 'या शाळेचे खाजगीकरण रोखल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर 'या' दिवशी ३,००० येणार? महत्त्वाचं कारण आले समोर

Ajit Agarkar: अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला; नवा सिलेक्टर कोण होणार? BCCI ने मागवले अर्ज

Shocking : भयंकर! पाण्याची टाकी साफ करायला उतरले परत बाहेर आलेच नाहीत; ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये आणखी एक दुष्काळाचा बळी; नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Lemon Water : सकाळी रिकाम्यापोटी 'या' बिया लिंबू पाण्यात मिसळून प्या; वजन, शुगर अन् बीपी कायम राहील कंट्रोलमध्ये

SCROLL FOR NEXT