Aditya Thackeray Likely to Skip BDD Chawl Event Saam Tv News
मुंबई/पुणे

निमंत्रण पत्रिकेत नाव, पण १ गोष्ट खटकली; आदित्य ठाकरे नाराज, BDDच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहणार?

Aditya Thackeray Likely to Skip BDD Chawl Event: बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात ५५६ रहिवाशांना चाव्या वाटप. कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व अनेक मंत्री उपस्थित. निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही आदित्य ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता

Bhagyashree Kamble

  • बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात ५५६ रहिवाशांना चाव्या वाटप

  • कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व अनेक मंत्री उपस्थित

  • निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही आदित्य ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता

  • भाषणाची संधी नसल्याने ठाकरे नाराज असल्याची चर्चा

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडातर्फे ५५६ रहिवाशांना चावी वाटप केले जाणार आहे. चाव्या वाटपाचा कार्यक्रम आज सकाळी ११ वाजता यशवंत नाट्यमंदिर येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांचंही नाव निमंत्रित पत्रिकेत आहे. मात्र, आदित्य ठाकरे अनुपस्थित राहणार असण्याची शक्यता आहे.

आज १४ ऑगस्ट रोजी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात म्हाडातर्फे ५५६ रहिवाशांना चाव्या वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांचं नाव आहे. मात्र, नाव असूनही ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. भाषणाचा कार्यक्रम नसल्याने ते उपस्थित राहणार नसल्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचीच भाषणं होणार आहेत. मात्र, बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमात स्थानिक आमदार असूनही आदित्य ठाकरे यांचं भाषण नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, इतर शिवसेना ठाकरेंचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळी आहेत. या चाळीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात आल्या. सुमारे ९२ एकर जमिनीवर १९५ बीडीडी चाळी असून, टप्प्याटप्प्यानं या चाळींचा पुनर्विकास केला जाणार आहे. दरम्यान, बीडीडी चाळीतील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची सदनिका दिली जाणार असून, त्याची सुरूवात झालीये.

पुनर्वसनातील सुविधांची वैशिष्ट्ये

पात्र रहिवाशांना 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची 2 बीएचके सदनिका विनामूल्य.

अत्याधुनिक सोयीसुविधा: व्हिट्रीफाईड टाईल्स, ग्रॅनाइट ओटा, अॅल्युमिनियम फ्रेम खिडक्या, ब्रँडेड प्लंबिंग फिटिंग्स.

प्रत्येक घराला एक पार्किंग, पोडियम पार्किंगवर उद्यान, अग्निरोधक यंत्रणा, 3 लिफ्ट (1 स्ट्रेचर लिफ्ट, 1 फायर लिफ्ट).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, बांगलादेशाने आयात बंदी हटवली

Banana Mask: केसांच्या वाढीसाठी 'असा' करा केळीच्या सालीचा वापर, वाचा हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत

Voter List Scam : हा तर मोठा घोटाळा! मतदार यादीत एकाच महिलेचं ६३ वेळा नाव; कुठे झाला घोळ?

Mumbai Dabbawala: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार ५०० स्क्वेअर फुटाचं घर

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिकांना सन्मान, १६ बीएसएफ जवांनाना शौर्य पुरस्कार प्रदान

SCROLL FOR NEXT