Aamshya Padvi Joins Shinde Group Saam tv
मुंबई/पुणे

Aamshya Padvi Joins Shinde Group : ठाकरे गटाला मोठा धक्का; आमदार आमश्या पाडवींचा शिंदे गटात प्रवेश

Aamshya Padvi Latest News : आमदार आमश्या पाडवी यांनी आज रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमश्या पाडवी यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

सूरज सावंत

Aamshya Padvi Latest News :

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तय्यत तयारी केली आहे. भाजपने नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून काँग्रेसला ही जागा सुटणार आहे. या जागेसाठी ठाकरे गटाचे आमश्या पाडवी देखील इच्छुक होते. या राजकीय घडामोडीनंतर आमदार आमश्या पाडवी यांनी आज रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमश्या पाडवी यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सुटणार असल्याचे बोलले जात आहे. या जागेसाठी आमश्या पाडवी इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट मिळालं नाही. नंदुरबार लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

आज रविवारी दुपारी आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून पाडवी यांची ओळख आहे.

शिंदे गटात प्रवेश केल्यावर आमदार आमश्या पाडवी काय म्हणाले?

आमदार आमश्या पाडवी म्हणाले, 'आम्ही सर्व एकाच पक्षात असताना माझी निवड झाली. मला दोन वेळा शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. मग माझी परिषदेत माझी निवड झाली. मी नंदुरबारचं प्रतिनिधित्व करतो. त्याचा अद्याप विकास झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विकासावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे'.

'आज मला ज्यांनी आमदार केलं, त्यांच्यासोबत जायला हवं म्हणून मी आज प्रवेश केला. काँग्रेससोबत आजपर्यंत दोन हात करत आलो. त्यांनाच आता पाठिंबा देत प्रचार कसा करणार? माझे लोक म्हणायचे आपल्या नंदुरबारचा विकास व्हायल हवा. म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला. मी शिवसनेत काम करत असताना दादा भुसेंनी कायम मार्गदर्शन केले. मी विश्वास ठेवून आलोय. आमच्या नंदुरबारचा विकास आणि कुपोषण हा घालवण्यात आम्हाला मदत करावी, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patan Monsoon Tourism: पावसाळ्यात नटलेलं साताऱ्यातील पाटण; आवर्जून भेट द्यावी अशी पर्यटनस्थळं

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे-अमित शहांची भेट, राऊतांच्या पोटात का दुखतंय?; सामंत भडकले | VIDEO

Train Travel Hacks: लोकल प्रवासात उलटी होत असेल तर लिंबू ठेवा जवळ; मिळेल त्वरित आराम

Heart attack in bathroom: बऱ्याच जणांना बाथरूममध्येच हार्ट अटॅक का येतो? यामागे काय कारणं आहे, जाणून घ्या

Sanjay Shirsat : शिरसाटांच्या हातात सिगारेट अन् बेडवर पैशांनी भरलेली बॅग; संजय राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT