Lok Sabha Election 2024: मुंबईत पाचव्या टप्प्यात होणार मतदार, २४ लाख ४६ हजार मतदार करतील मतदान

Mumbai News: भारत निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणूक – २०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
Mumbai News
Mumbai News Saam tv
Published On

Lok Sabha Election 2024:

भारत निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणूक – २०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात ३०-मुंबई दक्षिण मध्य,व ३१- मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ असून २४ लाख ४६ हजार ०८८ पात्र मतदार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात दिनांक २० मे २०२४ (सोमवार) रोजी पाचव्या टप्य्यात मतदान होणार असून दिनांक ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

मुंबई शहर जिल्हा कार्यालय, नियोजन भवन, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी माहिती दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai News
Lok Sabha Election 2024 : 'मी हेडलाइनवर नाही तर डेडलाइनवर काम करतो', लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर PM मोदी म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २६ एप्रिल २०२४ (शुक्रवार)  (Latest Marathi News)

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक ३ मे २०२४ (शुक्रवार)

नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक ०४ मे २०२४ (शनिवार)

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ०६ मे २०२४ (सोमवार)

मतदानाचा दिनांक २० मे २०२४ (सोमवार)

मतमोजणी दिनांक ०४ जून २०२४ (मंगळवार)

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक ६ जून २०२४ (गुरुवार)

आदर्श आचारसंहितेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे

सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीची आदर्श संहिता सुरु आहे. या आदर्श आचारसंहितेचे सर्वसंबंधीत घटकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आणि मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांसाठी असलेल्या सोयी सुविधा, मतदान केंद्राची रचना तेथील सुविधा, संवेदनशिल मतदान केंद्रासंदर्भात विशेष उपायोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.

Mumbai News
Lok Sabha Election 2024: 'प्रकाश आंबेडकरांना वेगळा प्रस्ताव जाणार नाही', मविआ लोकसभा निवडणूक जागावाटपाबद्दल राऊत स्पष्टच बोलले

मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी साडेबारा हजार कर्मचारी अधिकारी सज्ज

लोकसभा निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्हा अंतर्गत असलेल्या ३० मुंबई दक्षिण मध्ये ३१ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी साडेबारा हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त केले असून निवडणुका पारदर्शक नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी संजय यादव यांनी दिली.

मुंबई शहर जिल्ह्याच्या निवडणूक अनुषंगाने माहिती

एकूण मतदार :- २४ लाख ४६ हजार ८८

एकूण पुरुषः- १३ लाख २१ हजार ७८२

एकूण स्त्री:- ११लाख २४ हजार ८४

एकूण तृतीय पंथीः- २२२ (दोनशे बावीस)

१८+ या वयोगटातील मतदार

एकूण मतदारः- १७ हजार ७२६

एकूण पुरुषः ९ हजार ८७६

एकूण स्त्री:- ७ हजार ८५०

२०-२९ या वयोगटातील मतदार

एकूण मतदारः- २,लाख ९१ हजार ५०२

एकूण पुरुषः- १ लाख ६१ हजार ६९४

एकूण स्त्रीः- १लाख २९ हजार ७३७

दिव्यांग मतदार

एकूण मतदार :- ५०९३(पाच हजार त्र्यान्वय)

एकूण पुरुष:- ३०३२ (तीन हजार बत्तीस)

एकूण स्त्रीः-२०६१ (दोन हजार एकसष्ठ)

मतदान केंद्राची माहिती

दिव्यांग मतदार

एकूण मतदार :- ५०९३(पाच हजार त्र्यान्वय)

एकूण पुरुष:- ३०३२ (तीन हजार बत्तीस)

एकूण स्त्रीः-२०६१ (दोन हजार एकसष्ठ)

मतदान केंद्राची माहिती

एकूण मतदान केंद्रः- २५ हजार ९

एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ८

एकूण सखी महिला मतदान केंद्रः- ११

नवयुवकांनी चालविण्याचे मतदान केंद्रः ११

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com