Missing Gautam Gaikwad Health Update saam tv
मुंबई/पुणे

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Missing Gautam Gaikwad Health Update: सिंहगड किल्ल्यावरून पडलेला गौतम गायकवाड हा तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ सापडलाय. बचाव पथकांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

Bharat Jadhav

  • सिंहगडावरून पडल्याने गौतम गायकवाड ५ दिवसांपासून बेपत्ता होता.

  • बचाव पथकाने जंगलात सतत शोधमोहीम राबवली.

  • अखेर तो तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ सापडला.

  • त्याच्या प्रकृतीबाबत सकारात्मक अपडेट समोर आलं आहे.

सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड आज अखेर सापडला. गौतम गायकवाड सायंकाळी सात वाजता किल्ले सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांच्या समाधी मागील परिसरामध्ये मिळून आला. गौतम गायकवाड ५ दिवसांपासून बेपत्ता होता. बचाव पथक सतत शोध घेत होते. आज तो त्यांना मिळून आलाय. त्याच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आलीय.

गौतम गायकवाड हैदराबाद येथून आपल्या ५ मित्रासह पुणे येथे फिरायला आला होता. बुधवारी दुपारी ४:३० वाजता ते सिंहगडावर आला होते.या वेळेस सायंकाळच्या सुमारास तानाजी कड्याजवळ ते गेले होते. त्यावेळी गौतम याने लघवीला जाऊन येतो असे मित्रांना सांगितले. मात्र बऱ्याच वेळानंतरही तो परत आला नव्हता. म्हणून मित्रांनी गौतम याचा शोध घेतला असता तो सापडला आला नाही. जवळच हवा पॉइंटशेजारी त्याची चप्पल सापडली, मात्र तो दिसला नव्हता. गेल्या पाच दिवसांपासून तो बेपत्ता होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सिंहगड भागात मुसळधार पाऊस असून, वाऱ्याचा वेगही जास्त होता. वाऱ्याचा व जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळला. त्यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण पोलीस कर्मचारी, स्थानिक गिर्यारोहक गौतमचा सलग पाच दिवसापासून शोध घेत आहेत.

जवळपास एक हजार फुटापर्यंत खोल दरीत उतरून आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचा शोध घेत होते. आज तानाजी मालुसरे यांच्या समाधी मागील परिसरामध्ये गौतम सापडला होता. त्याने मदतीसाठी पर्यटकांना आवाज दिला होता. त्यानंतर त्या पर्यटकांनी तेथील स्थानिकांना याची माहिती दिली.

हुडी घातलेल्या व्यक्तीने वाढवलं गूढ

हवेली पोलिसांनी वनविभागाच्या वनसंरक्षण समितीच्या कोंढणपूर येथील उपद्रव शुल्क नाक्यावरील सीसीटीव्हीच्या फुटेज तपासल्यानंतर एक हुडीवाला व्यक्ती तेथून जाताना दिसत आहे. त्यामुळे गूढ वाढले होते. कारण गौतम गायकवाड बेपत्ता झाला होता त्यानंतर हुडीवाला व्यक्ती दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

SCROLL FOR NEXT