Police investigating after the body of a missing 27-year-old man was found in a lodge room in Pune’s Camp area. Saam Tv
मुंबई/पुणे

आठ दिवसानंतर लॉजमध्ये आढळली बॉडी; गायब झालेल्या २७ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं?

27 Year Old Missing Youth Found Dead In Pune Lodge: सातारा जिल्ह्यातील वाई येथून बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह पुण्यातील कॅम्प परिसरातील लॉजमध्ये आढळला. आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई येथून 8 दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या एका 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह हा पुण्यात आढळून आला आहे. पुणे शहरातील नेहमीच वर्दळ असलेल्या कॅम्प परिसरातील एका लॉजमध्ये या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पीयूष ओसवाल हा सातारा जिल्ह्यातील राई या गावात राहत होता. या मृत्यूमुळे ओसवाल कुटुंबियात शोककळा पसरली आहे.

पुणे येथील लष्कर कॅम्प परिसरातील मुकेश लॉजमदये ही खळबळ माजवणारी घटना घडली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास लॉजमधील एका खोलीतून अचानक उग्र आणि भयावह वास येऊ लागला. यामुळे कर्मचाऱ्यांनी लगेचच रूमजवळ जात खोलीचा दरवाजा ठोठावला. जोरदार आवाज देऊ लागले. मात्र आतमधून कोणताही प्रतिसाद आला नाही. यावेळी त्यांनी पोलिसांना बोलवले.

माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस ठण्याचे पथक लॉजवर दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला आणि पाहताच क्षणी त्यांना मोठा हादरा बसला. पीयूष हा लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची अवस्था पाहता आणि खोलीत पसरलेली दुर्गंधी लक्षात घेता, पीयुषने सुमारे दोन ते तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पीयूष हा मूळचा वाईचा होता. आठ दिवसंपूर्वीच तो घरातून निघाला होता. तो घरी न आल्याने आणि त्याचा कोणताही संपर्क होत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी वाई पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. वाई पोलिसांनी तातडीने तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून तपास सुरू केला होता. एकीकडे तपास सुरू असताना पुणे पोलिसांना त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडवून देणारे वळण या प्रकरणाला लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विकास गोगावले यांना जामीन मंजूर

Actor Arrested: 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोप

Ladki Bahin Yojana: १८१ नंबर करा नोट; एक कॉल अन् लाडक्या बहिणींचे सर्व प्रॉब्लेम होतील Solved

'सोंगाड्या'चं नाव देशभर गाजलं; गावगाड्यातील तमाशा सम्राटाला पद्मश्री, रघुवीर खेडकर आहेत तरी कोण?

Kalyan Tourism : शहराच्या गजबजाटापासून दूर 'या' ठिकणी घ्या निवांत विश्रांती, कल्याणजवळील निसर्गरम्य पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT