crime news, mira bhaynder saam tv
मुंबई/पुणे

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर सात कुख्यात गुंडांना पाच जिल्ह्यातून केलं हद्दपार

ही कारवाई मिराभाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

चेतन इंगळे

Ganesh Utsav 2022 : गणेशाेत्सवाच्या (ganesh utsav) पार्श्वभुमीवर नालासोपारा येथील एकाच टोळीतील सात कुख्यात गुंड व चोरट्यांना तुळींज पोलिसांनी (police) एकाच वेळी पाच जिल्ह्यांतून हद्दपार केले आहेत. नालासोपारा , तुळींज, आचोळे आणि पेल्हार पोलीस ठाण्यात या चोरट्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत.

मीरा भाईंदर - वसई विरार आयुक्तालयाची ही पहिलीच मोठी कारवाई असून सात जणांना एकत्र तडीपार केले आहे. ही कारवाई मिराभाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या आदेशानुसार डीसीपी संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पीआय राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

तुळींज पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनूसा शुभम उर्फ ​​बाबा प्रेमशंकर मिश्रा, संजय उर्फ ​​मुन्नी लवकुश सिंग, सत्यम उर्फ ​​आर्दश प्रशांत रॉय, अभिषेक सुनील शर्मा, सूरज अरविंद सिंह उर्फ ​​कबाडे, देव नरेश सिंह उर्फ ​​भीम आणि लवकुश सबजित पांडे यांना पालघर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई व रायगड या पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही विधानसभा जिंकणार - देवेंद्र फडणवीस

Ananya Panday: अनन्याची कातिल अदा, फोटोंनी उडवला धुराळा

Spring Onion: कांद्याच्या पातीचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Flight in WIFI : फ्लाइट मोडचा जमाना गेला! आता विमानात मनसोक्त इंटरनेट वापरता येणार, कसं? वाचा सविस्तर

Virat Kohli Childrens Name: विराट कोहलीच्या मुलांची नावे काय? तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT